burglary News esakal
नाशिक

Crime : मालेगावात घरफोडीचे सत्र सुरुच; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी चोरी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. तालुक्यातील वडेल येथील दुध संकलन केंद्र व सायने येथील गोदामातून पाऊणेनऊ लाखांचा ऐवज पळवून नेल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला.

त्यापाठोपाठ येथील सामान्य रुग्णालयातील दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करुन सुमारे सव्वाचौदा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी (ता. १४) सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. (Burglary session continues in Malegaon Nashik crime Latest Marathi News)

येथील सामान्य रुग्णालयात २४ तास वर्दळ असते. रुग्णालयाच्या समोरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बंगले व निवासस्थाने आहेत. रुग्णालयाच्या आवारातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तबरेज अन्वर बागवान (वय ४७, रा. वैद्यकीय अधिकारी शासकीय निवासस्थान, प्लॉट क्र. ४) यांच्या घरातून चोरट्यांनी अडीच लाख रुपये रोख, ४० हजारांचा सोन्याचा हार व कानातील झुमके, कानातील डायमंड एअर रिंग, गळ्यातील चैन, कानातील दोन जोड्या, सोन्याचे ब्रेसलेट, अंगठी असा एकूण १३ लाख ११ हजार ३८७ रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

येथील घरफोडीनंतर चोरट्यांनी डॉ. बागवान यांच्यासमोर राहणारे डॉ. इम्रान खान इस्माईल खान पठाण यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील लोकंडी कपाटातून सोन्या- चांदीचे दागिने, हिऱ्याची अंगठी, चांदीच्या साखळ्या, घड्याळ असा १ लाख २० हजार २५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी एकूण १४ लाख ३१ हजार ६३७ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. शहर पोलिस ठाण्यात डॉ. तबरेज बागवान यांच्या तक्रारीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

घरफोडीची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अनिल पठाडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करून पंचनामा केला.

पोलिसांसमोर आव्हान

माजी आमदार रशीद शेख यांनी बुधवारीच (ता. १४) पत्रकार परिषद घेऊन स्थानिक पोलिसांवर टिकेची झोड उठवली असून, शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचा व सर्रास अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप केला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात घडलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना, चोऱ्या, घरफोड्या व खून चिंताजनक आहे. तर, मालेगाव शहर परिसरातील चोरी, घरफोड्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT