chandori fire.jpg 
नाशिक

महावितरणचा हलगर्जीपणा! चांदोरीत पाच एकर ऊस जाळून खाक; शेतकऱ्यांचा आरोप

सागर आहेर

चांदोरी ( जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील आगीत सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारामध्ये घर्षण होऊन त्याची ठिणगी पडून आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शॉर्ट सर्किटने ऊसाच्या क्षेत्राला आग,लाखोंचे नुकसान

चांदोरी येथील गट क्र.६४८  सतीश गायखे ,माणिक गायखे ,संजय गायखे  या शेतकऱ्यांचा उस  जळून खाक झाला आहे. ही घटना शुक्रवारी(दि ५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या उसाच्या क्षेत्रावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी या तारा हाताच्या उंचीप्रमाणे आहे. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. शिवाय वाऱ्याचे प्रमाण ही जास्त असल्याने आग पसरली गेली.

महावितरण कंपनीचे दुर्लक्ष
ही घटना तात्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.यामुळे बाजूचा उसाचे क्षेत्र वाचले गेले. चांदोरी येथील अनेक भागात विजेचा तारा अतिशय कमी उंचीवर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या थेट उसाला चिकटतात व घर्षण होऊन ठिणग्या तयार होऊनआग लागते. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी व सकाळ च्या माध्यमातुन या तारा बाबत अनेकदा मागणी करून सुद्धा वीज महावितरण कंपनी या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

वीज वाहक तारा अगदी कमी उंची वर
चांदोरी परिसरातील सुकेना रस्ता भागात विद्युत तारांची उंची अतिशय कमी आहे. तसेच जास्त दिवसापासून त्याची तपासणी करणे गरजेचे आहे या कडे गंभीरपणे विचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी  मे महिन्यात चांदोरी शिवारात सुमारे दहा एकर ऊस व द्राक्ष बाग वीज तारा तुटून आग लावून जळून खाक झाले या संदर्भात पंचनामे मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ महिने उलटून सुद्धा मदत प्राप्त झाली नसल्याचे समोर आले आहे.
 

महावितरण विभागाने  चांदोरी शिवारातील खाली आलेल्या तारांचा तसेच रोहित्राचे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. -अनिल भोर (सामाजिक कार्यकर्ते)
 

वीज तारा मुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनी ने दोन पोल मधील अंतर जिथे जास्त असेल तिथे मध्ये पोल टाकणे. पोल सरळ करून ताण देने व लघु दाब वाहिन्या वर  यल.टी स्पेसर टाकण्याचे काम सुरू केले  आहे . भविष्यात अश्या घटना टाळण्यासाठी महावितरण  विभाग प्रयत्नशील आहे.- विशाल मोरे (सहाय्यक अभियंता, चांदोरी सब स्टेशन,)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Baramati Investment Fraud: बारामतीत गुंतवणुकीच्या नावाखाली ६३ लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

SCROLL FOR NEXT