Accidental Vehicle esakal
नाशिक

Nashik Accident News: बस अन् आरएमसी मिक्सर ट्रकचा अपघात; ट्रक चालक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानी जवळ मिक्सर ट्रक आणि राज्य महामंडळाच्या लाल परी बसचा समोरासमोर धडक झाली.

या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक बाळू एकनाथ बेंडकुळे ( ६०, रा,आशेवडी, ता. दिंडोरी) ठार झाला असून बस चालक गंभीर जखमी झाला आहे. (Bus and RMC mixer truck accident truck driver killed on spot Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ बस आगारातील बस क्रमांक एम एच ४० वाय ५९७६ ही गुरुवार (ता.२२) रोजी पेठ हून नाशिक व्हाया पुण्याला चालली होती. साडे चार ते पाऊने पाच वाजेच्या दरम्यान पेठरोड हून मार्गक्रमण करीत असताना नाशिककडून आशेवाडी कडे जाणारा आरएमसी मिक्सर ट्रक यांचा समोरा समोर अपघात झाला.

या अपघातात आशेवाडी येथील साठ्ठ वर्षीय मिक्सर ट्रक चालक बाळू बेंडकुळे जागीच ठार झाले. तसेच या बस चालक गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास आठ ते दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

पेठ व जुना आडगाव नाका येथील १०७ चे ॲम्बुलन्स ने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले असून, काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT