The bus brought to the police station. In the second picture, passengers are sitting in the premises of Bhadrakali Police Station. esakal
नाशिक

Nashik Crime News : बसमधील वाहक, महिलांना रिक्षाचालकांकडून मारहाण; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : द्वारका परिसरात दोन रिक्षा चालकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे (एमएच २०, बीएल २८८३) वाहक आणि प्रवासी महिलांना मारहाण केली.

रविवारी (ता. २३) दुपारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात भद्रकाली पोलिसांनी दोघा संशयित रिक्षा चालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bus conductors women assaulted by rickshaw drivers Filed case at dwarka Nashik Crime News)

राज्य परिवहन महामंडळाची ही बस धुळे, नाशिकमार्गे बोईसर जात होती. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एका प्रवाशी महिलेला द्वारका येथे उतरावयाचे असल्याने बस थांबली होती. त्यावेळी एकाने तेथे येऊन बस वाहक विजय बनसोडे यांच्याशी हुज्जत घातली.

द्वारका येथे सोडायचे असतानाही तुम्ही मागे का सोडले? तुमची एस. टी. डेपोत तक्रार करतो, असे संबंधिताचे म्हणणे होते. त्याचवेळी दोन रिक्षाचालक तेथे आले व त्यांनीही बनसोडे यांना शिवीगाळ व मारहाण करू लागले.

त्यावेळी बसमधील अन्य महिला प्रवाशांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अबूबकर मुजीब शेख (रा. द्वारका परिसर) आणि अय्याज हैदरअली शहा (रा. बागवानपुरा) दोघांना ताब्यात घेतले. वाहक बनसोडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, या वादात अन्य प्रवासी मात्र नाहक भरडले गेले. प्रवाशांसह बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गुन्हा दाखल करणे, मेडिकल चेकअप, घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेणे, जाब जबाब घेणे यात संपूर्ण दिवस गेला.

तोपर्यंत अन्य प्रवाशांना विनाकारणच पोलीस ठाण्यात ताटकळत बसून राहावे लागले. उन्हामुळे बसमध्ये बसणे शक्य होत नसल्याने काही प्रवासी पोलीस ठाण्याच्या आवारातील वृक्षाखाली बसले, तर काही जागा मिळेल त्याठिकाणी बसले होते.

कंटाळवाने झाल्याने काहींनी पोलीस ठाण्याच्या आवारात फेरफटका मारून पश्‍चातापही व्यक्त केला. एस. टी. महामंडळाचा अनागोंदी कारभार व पोलिसांची वेळखाऊ प्रक्रिया यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याची प्रतिक्रिया काहींनी नोंदविली.

पोलीस कारवाईत वेळ लागणार असल्याने, अन्य बसची व्यवस्था करून प्रवाशांना रवाना करणे गरजेचे होते. त्याऐवजी प्रवाशांना भर दुपारी उपाशी-तापाशी पोलीस ठाण्यातच बसून राहावे लागले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT