beaten to bus driver.jpg
beaten to bus driver.jpg 
नाशिक

कार आडवी घालून 'ते' बसमध्ये चढले!...अन् त्यांनी चक्क...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) नाशिक-पुणे महामार्गावर ओम्नी कारमधून आलेल्या प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाची सिन्नर आगराची बस थांबवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अशी आहे घटना

नाशिकहून सिन्नरकडे येणारी एमएच १४, बीटी १३३३ ही बस मोहगावच्या शिवारातील हॉटेल सूर्याजवळ आली असतांना अचानक रस्ता ओलांडणारा दुचाकीस्वार समोर आला. त्याला वाचविण्यासाठी बसचालक बाबू काकड यांनी अचानक बस थांबविली. याच दरम्यान बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणारी मारुती ओम्नी कारदेखील ब्रेक दाबत थांबली. बसचालकाने अचानक बस उभी केल्याने आमच्या वाहनाचे नुकसान झाले असते आणि अपघात घडला असता तर या गोष्टीला जबाबदार कोण? असा राग मनात धरून ओम्नीचालकाने आणखी दोन ओम्नी चालकास आपल्यासोबत बोलावून घेतले. मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ कार आडवी घालून बसमध्ये चढून बसचालक काकड यांना मारहाण व शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या झटापटीत काकड यांच्या पायाला बसचा पत्रा लागून ते जखमी झाले आहे. बसवाहकाने तीनही ओम्नीचे नंबर लिहून घेत सिन्नर आगाराला घटनेची माहिती दिली. 

मारहाण करणारे त्यांच्या वाहनातून सिन्नरच्या दिशेने रवाना झाल्यावर बस सिन्नर आगारात नेण्यात येऊन सिन्नर आगार व संघटनेच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाने तक्रार दाखल केली असून, चालक काकड यांच्या तक्रारीहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs CSK Live IPL 2024 : साईच्या आधी शुभमननं मारला नंबर; 200 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT