Maratha Reservation MSRTC Bus Cancellation esakal
नाशिक

Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगर, येवल्‍याची बससेवा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे वातावरण चिघळल्याने नाशिकहून छत्रपती संभाजीनगर तसेच जिल्ह्यांतर्गत येवल्‍यासाठी बससेवा ठप्प झालेली होती.

परंतु आंदोलन निवळल्‍यानंतर शुक्रवार (ता.३) सकाळपासून छत्रपती संभाजीनगर तसेच येवल्‍यासाठी बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. (Bus service to and from Chhatrapati Sambhajinagar and yeola was restored nashik news)

नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी सर्व बसफेऱ्या पूर्ण झाल्‍याची माहिती महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

नवीन सीबीएस बसस्थानकावरून सकाळपासून छत्रपती संभाजीनगरसाठी बस सोडण्यात आल्‍या. तसेच पुण्यासह इतर मार्गांवरही निर्धारित वेळापत्रकानुसार बसगाड्या धावल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

राज्‍यस्‍तरावर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची धग निर्माण झालेली असल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था प्रभावित झाली होती.

नाशिकहून छत्रपती संभाजीनगर तसेच जिल्ह्यांतर्गत येवल्‍याची बससेवा ठप्प झालेली होती. सणासुदीच्‍या पार्श्वभूमीवर बससेवा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागून होती. अखेर सेवा सुरु झाल्‍याने प्रवाशांनीदेखील सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

Delhi Protest: आंदोलकांना रोखले;अभिजित दीपकेंसह अनेक नेत्यांची धरपकड

आजचे राशिभविष्य - 11 ऑक्टोबर 2026

High Protein Veg Pizza: मैदा नाही, तरीही चव एकदम भारी! घरीच बनवा हाय प्रोटीन व्हेज पिझ्झा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT