polytechnical student.jpg 
नाशिक

व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचाय? अद्यापही अंतिम संधी उपलब्ध

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीत कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम संधी अद्याप उपलब्ध आहे. शहरातील स्वयंरोजगार देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी नऊशे जागा उपलब्ध आहेत. 

व्यवसाय शिक्षणच्या ९०० जागा शिल्लक  

दहावीनंतर लगेचच दोन वर्षे शिक्षण घेऊन अर्थार्जन करावयाचे असेल व भविष्यात चांगले करिअर करायचे असेल, तर अकरावी व बारावी या दोन वर्षांत व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे निश्‍चितच फायदेशीर ठरेल. या शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायातील कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केल्यास स्वयंरोजगार करता येईल किंवा नोकरीही मिळू शकते, तसेच त्याच क्षेत्रासह इतर क्षेत्रातील उच्च शिक्षणही घेता येईल. अशा प्रकारचे अभ्यासक्रम शहरातील के.टी.एच. म., एच.पी.टी., आर.वाय.के., बी.वाय.के., जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सातपूर), शासकीय तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालय, एस.एम.आर.के. महाविद्यालय, तसेच नाशिक रोड भागातील आरंभ महाविद्यालय, बिटको कॉलेज, के. जे. मेहता कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू आहेत. 

विविध अभ्यासक्रम
 
* अभियांत्रिकी : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी 
* वाणिज्य : लॉजिस्टिक ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, अकाउंटिंग फायनान्शिअल ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस ॲन्ड इन्शुरन्स, मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट. 
* पॅरामेडिकल : मेडिकल लॅब टेक्निशियन 
* होम सायन्स : केटरिंग फूड प्रॉडक्शन, टुरिझम ॲन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT