Flood affected area latest rain update marathi news
Flood affected area latest rain update marathi news esakal
नाशिक

नाशिक : तुम्हीच सांगा, आम्ही जगायचे कसे?

दत्ता जाधव

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. त्यातच गोदेची पाणीपातळी (Water Level) कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले आहेत.

अशा स्थितीत कुटुंबियांसह संसाराचा गाडा हाकायचा कसा, अन्‌ जगायचे कसे, असा सवाल गंगाघाटावर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या जवळपास दोनशे व्यावसायिकांना पडला आहे. (Businesses on Gangaghat are affected by continuous floods Nashik Latest Monsoon News)

पावसाने आता थोडीशी उसंत घेतलेली आहे. मात्र थोड्या-थोड्या वेळाने तो पुन्हा सुरू होतो. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर धरणातील विसर्ग काही प्रमाणात सुरूच आहे. आता काही प्रमाणात पाणीपातळी कमी झालेली असली तरीही अद्यापही गोदावरी दुथडी वाहत आहे.

त्यातच स्मार्टसिटीच्या कामांसाठी जागोजाग खोदून ठेवलेले रस्ते, पावसाची संततधार यामुळे गंगाघाटाच्या दुतर्फा असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. गंगाघाटावर लहान- मोठे धरून जवळपास दोनशे टपरीधारक व्यवसाय करतात.

यात खाद्यपदार्थांपासून, फुले, फळ विक्रेते, सलून व अन्य व्यावसायिकांचा मोठा समावेश आहे. गत आठवड्यात पाणी पातळी वाढू लागताच या व्यावसायिकांनी अन्य टपरीधारकांच्या मदतीने टपऱ्या हटविल्या खऱ्या. परंतु, त्यातील अनेक टपऱ्या भांडी बाजार, सरदार चौक, दिल्ली दरवाजा, मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह आदी ठिकाणी हलविण्यात आल्या.

मात्र, अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने या व्यावसायिकांचे जगणे अवघड बनले आहे. या दोनशेच्या आसपास संख्या असलेल्या टपरीधारकांच्या मागे त्यांचे कुटुंबीय गृहित धरल्यास जवळपास हजार जणांना त्याची प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष झळ बसली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गत साडेसात वर्षांपासून शहरात सत्ताधारी भाजपचे तीन आमदार आहेत. याशिवाय तब्बल एकशे एकवीस माजी नगरसेवक आहेत. परंतु, त्यापैकी कोणीही आमच्याकडे फिरकले नसल्याची खंत या व्यावसायिकांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना व्यक्त केली. आता आम्हाला पाऊस उघडण्याची प्रतिक्षा असल्याने सांगण्यात आले.

"आमच्या दुकानासमोरच स्मार्टसिटीतंर्गत गटारीचे खोदकाम अनेक दिवस सुरू होते. त्यामुळे मागील महिन्यापासूनच व्यवसाय ठप्प होते. त्यातच आता पुरामुळे सर्व सामान हलविले आहे."

- दत्ता पवार, व्यावसायिक, गंगाघाट

"आधी स्मार्टसिटीची रखडलेली कामे, त्यानंतर धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे घाटावरील सर्वच व्यवहार बंद झालेत. आता पुढील काहीकाळ जगावे कसे, हा प्रश्‍नच आहे."

- महेश गोवर्धने, व्यावसायिक, गंगाघाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT