Godavari Ghats KM_SAKAL
नाशिक

गोदाघाटावरील अर्थचक्राला गती; दुसरी लाट ओसरताच व्यवसाय पूर्वपदावर

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यास पंचवटीतील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामकुंड आणि लगतचा गोदाघाट परिसरदेखील अपवाद नव्हता. या काळात अनेक निर्बंध आल्याने परिसरातील लहान-मोठे व्यावसायिक, दुकानदार यांच्यासह हातावर काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने रामकुंड तीर्थक्षेत्री सुरू असलेले अर्थचक्र ठप्प झाले होते. मात्र, आता काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा एकदा रामकुंड आणि लगतच्या गोदाघाट परिसरातील अर्थचक्राला गती मिळाली आहे. (businesses on the Godavari Ghats are returning to normal as corona wave subsides)

रामकुंड तीर्थक्षेत्र असल्याने कायमच भाविक, पर्यटकांची वर्दळ असते. गोदेच्या तीरावर धार्मिक विधी करण्यासदेखील महत्त्व आहे. प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर, श्री नारोशंकर, गंगा गोदावरी, सांडव्यावरची देवी अशी असंख्य लहान-मोठी प्रसिद्ध मंदिरे असल्याने शहराच्या कान्याकोपऱ्यातून भाविक भक्तगण येत असतात. या माध्यमातून परिसरातील हॉटेल, पूजासाहित्य, प्रसाद, फूल विक्रेते, धर्मशाळा, लॉजिंग, सलून, रिक्षा, गाइड, कपडे, कटलरी साहित्य यांसारख्या अनेक लहान-मोठ्या दुकानदारांचा व्यवसाय सुरू आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच माध्यमातून वर्षानुवर्षे सुरू आहे. यातून परिसरातील अर्थचक्र फिरत असते. मात्र, कोरोनामुळे अनेक निर्बंध लागले. पर्यटनासाठी बंदी आली. मंदिरे अद्यापही खुली नाही झाली. अनेक दिवस लॉकडाउन असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होऊन आर्थिक नियोजन कोलमडले. हातावर कमविणारे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. मागील वर्षीच्या दिवाळीच्या दरम्यान काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन परिस्थिती आटोक्यात येईल, ही आशा असतानाच मार्च महिन्यात कोरोना दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाउन वगळता इतर वेळी व्यवसाय सुरू राहत असल्याने स्थानिक व्यावसायिकांची चिंता काही प्रमाणात का होईना दूर होत आहे.

धार्मिक स्थळे अन् पर्यटनाकडे नजरा

रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील व्यवसाय काही प्रमाणात सुरळीतपणे सुरू झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्रामुख्याने परराज्यातून येणारे भाविक आणि पर्यटक यांच्या माध्यमातून येथील व्यवसायाच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थाने गती मिळते. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे आणि पर्यटनावरील बंदी हटविण्यात आली नाही. जेव्हा कोरोनाचे समूळ उच्चाटन आणि संपूर्ण निर्बंध शिथिल होऊन पूर्ण क्षमेतेने व्यवसाय सुरू होतील, तेव्हा खऱ्या अर्थाने गोदाघाट परिसरातील अर्थचक्राला अधिक प्रमाणात गती मिळणार आहे. सर्वांची धार्मिक स्थळे कधी खुली होतील आणि पर्यटनावरील बंदी कधी उठेल याकडे लक्ष लागले आहे.

(businesses on the Godavari Ghats are returning to normal as corona wave subsides)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT