Godaghat Flood News esakal
नाशिक

भय इथले संपत नाही...; संततधारेमुळे नदीकाठचे व्यावसायिक, रहिवासी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जुलैच्या सुरवातीपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे गंगापूरसह सर्वच धरणे काठोकाठ भरलेली असताना अद्यापही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे एक, दोन नव्हे तर तब्बल चार महापूर अनुभवलेल्या गोदाकाठच्या रहिवाशांसह व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. (businessman residents of godavari river bank scared due to flood Nashik Latest Marathi News)

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यावर जुलैपासून सुरू झालेली पावसाची धार अद्यापही थांबायला तयार नाही. संततधारेमुळे नदी, नाले भरभरून वाहू लागले असून, गंगापूरसह कश्‍यपी, बेजे येथील गौतमी धरण भरले आहे. त्यामुळे थोड्याशा पावसानंतरही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गुरुवारी (ता. १५) दोन टप्प्यांत गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी गोदावरी पुन्हा दुथडी वाहू लागली. रात्रभर पाऊस झाल्यास पाणीपातळीत वाढ होऊ शकते. हे लक्षात आलेला सराफ बाजार, दिल्ली दरवाजा, सोमवार पेठ, भांडी बाजार येथील व्यावसायिक कमालीचा धास्तावला. त्यामुळे अनेकांनी रात्री या ठिकाणी भेट देत पाणी पातळीची पाहणी केली.

स्मार्ट कामांना ग्रहण

स्मार्टसिटी कंपनीकडून गंगाघाटावर गेल्या अनेक दिवसांपासून फरशा बसविणे, दीपस्तंभ बसविणे अशी विकासकामे सुरू आहेत. परंतु पाऊस व सततची पूरस्थितीमुळे या कामांत अडथळे येत आहेत. काही काही ठिकाणच्या फरशा पुन्हा वाहून गेल्या आहेत. नदीपात्रालागत सुरू असलेली ही कामे पूरस्थितीत टिकणार का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

९ सप्टेंबर ६९च्या स्मृती

नाशिकमध्ये ९ सप्टेंबर १९६९ ला पहिला महापूर आला होता. तीन दिवसांच्या संततधारेनंतर आलेल्या पहिल्या महापुराने हाहाकार माजला होता. नेहरू चौक, सोमवार पेठ, सराफ बाजार, गुलालबाज वाडी, तिवंधा अशा शहरातील सखल भागातील सर्वच घरांचे पहिला मजला रात्रभर पाण्यात होता.

पहाटेच्या सुमारास पाणी उतरण्यास सुरवात झाली. तेव्हा शहराचा आकार मर्यादित होता, तरीही रात्री वाढलेल्या पाण्यामुळे व्यावसायिकांसह रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतरही शहराने तीन महापूर पाहिले, परंतु १९६९च्या पुराची तीव्रता अधिक असल्याचे जुनेजाणते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Wari Accident: जेजुरी अपघातानंतर आरोग्य विभागाची युद्धपातळीवर धाव; मृत वारकऱ्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याची शासनाची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT