Crime News esakal
नाशिक

Nashik : वाद मिटविणे व्यापाऱ्यांना पडले महागात!; एक व्यापारी गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : दिंडोरी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांच्या दोन गटाचे भांडण सोडविणे दोन भाजीपाला व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. मध्यस्थी करत असतानाच एका गटाच्या काही संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.

यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाची देखील संशयितांनी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे काही काळ बाजार समितीच्या आवारात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (businessman was seriously injured two groups fight of hamal nashik Latest Crime News)

बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास बाजार समिती आवारातील अंबिका व्हेजिटेबल कंपनीच्या बाहेर हमालाच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात बबलू भल्ला (पंजाबी) याला काही संशयितांनी मारहाण केली.

हे भांडण सोडविण्यासाठी भाजीपाला व्यापारी मंगेश लहामगे आणि उमेश गाडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी थेट व्यापाऱ्यांवर तीक्ष्ण हत्याऱ्याने सपासप वार केले. त्यानंतर संबंधित भाजीपाला व्यापाऱ्याच्या कार्यालयाचे देखील तोडफोड करत मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पाहणी केली. मात्र पोलिस येत असल्याचे समजताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेतील काही संशयितांचे नावे समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बाजार समिती नेहमी चर्चेत

नाशिक बाजार समिती गुन्हेगारी घटनांमुळे कायम चर्चेत राहिली असून व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाची चोरी, मोबाईल चोरी, शेतमालाच्या जाळ्यांची चोरी, दुचाकी चोरी हे नियमित घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

गरजेपेक्षा जास्त सुरक्षारक्षक असल्याचे सांगत सुरक्षा रक्षक कमी करून बाजार समितीच्या तिजोरीत भर पडली असल्याचे चित्र रंगवले गेले. दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर असो कि शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम नसल्याने गुन्हेगारी तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली बघायला मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT