Cabbage at the market price of fifteen paisa per kg Nashik Marathi News 
नाशिक

सोन्यासारख्या कोबीला १५ पैसे किलोचा दर! हतबल शेतकऱ्याने पिकात सोडली मेंढरे

सुदाम गाडेकर

नगरसूल (जि. नाशिक) : पोटच्या लेकरागत वाढवलेल्या सोन्यासारख्या जोमदार कोबीच्या उभ्या पिकात काळजावर दगड ठेवून जड अंतःकरणाने अनकाई येथील शेतकऱ्याने मेंढरे सोडली. बाजारात कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांना कवडीमोल भाव मिळतोय. स्वप्न चक्काचूर झाल्याने शेतकरी अक्षरश: हतबल झाले आहेत. 

अतिवृष्टीमुळे यंदा खरिपात कांदा, मका, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत चांगल्या उत्पन्नाची हिरवीगार स्वप्न रंगवून अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेण्यासाठी कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, मेथी आदी भाज्यांची लागवड केली. मात्र, सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्च तर दूरच, केवळ येवला, मनमाडपर्यंतचा वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्यामुळे अनकाई (ता. येवला) येथील शेतकरी दगू सोनवणे यांनी काढणीला आलेल्या कोबीच्या जोमदार पिकात मेंढ्या सोडल्या. 

दगू सोनवणे यांनी दरसवाडी येथील नर्सरीमधून कोबीची रोपे विकत आणून दीड एकरात पीक घेतले. मशागत, खत, पाणी व मेहनतीने जोमदार पीक तयार केले. चांगला भाव मिळेल, या आशेने स्वप्न रंगवले. मात्र, बाजारात सध्या भाज्यांचे दर घसरल्याने सोनवणे यांनी कोबीच्या पिकात मेंढ्या सोडून मन:स्ताप व संताप व्यक्त केला. 

तीन किलोच्या एका कोबीला फक्त पन्नास पैसे दर मिळाला. म्हणजेच प्रतिकिलो पंधरा पैसे दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगायचे अन्‌ शेती करायची कशी. सरकारने आता आधार द्यावा. 
-नवनाथ सोनवणे, शेतकरी, चांदगाव, ता. येवला 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT