Guardian Minister Dada Bhuse, Shiv Sena Liaison Chief Bhausaheb Choudhary, District Chief Ajay Boraste, Liaison Leader Raju Lavate, Municipal Chief Praveen Tidme etc. while giving a statement to Chief Minister Eknath Shinde demanding cancellation of excessive house rent. esakal
नाशिक

Shinde Group: नाशिककरांवर लादलेली अवाजवी घरपट्टी रद्द; शिवसेनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Shinde Group : महासभेने अवाजवी घरपट्टीचा ठराव करूनही शासनाकडे न पाठविता तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दप्तरी दाखल करून घेत नाशिककरांवर लादलेली अवाजवी घरपट्टी रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी अवाजवी घरपट्टी रद्द करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. औद्योगिक घरपट्टीत लावण्यात आलेले दोन कर रद्द करण्याच्या सूचना दिल्या. (Cancel exorbitant rent imposed on Nashik people Chief Minister assurance to Shiv Sena delegation nashik)

हॉटेल ताज येथे औद्योगिक क्षेत्रातील विकास व नियंत्रण नियमावलीच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संपर्क नेते राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वातील नवीन मिळकतींना नवीन घरपट्टी लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जवळपास वीसपटींनी घरपट्टीत वाढ झाली.

या निर्णयामुळे शहरात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलने झाली, परंतु त्यानंतरही करवाढ मागे घेतली गेली नाही. महासभेचा ठराव नियमाप्रमाणे शासनाकडे विखंडीत करण्यासाठी पाठविणे गरजेचे असताना मुंढे यांनी दफ्तरी दाखल ठराव केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे औद्योगिक, वाणिज्य व रहिवासी घरपट्टीत झालेली अवाजवी करवाढ मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले. अवाजवी करवाढ रद्द करून नियमात घरपट्टी आणण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

एकाच दिवसात एकदम महसूल वाढवण्याचा हा प्रयोग योग्य नाही, आमचं सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार आहे, नाशिककरांवर लादलेली ही अवाजवी घरपट्टी रद्द करण्याचे आश्वासन दिले.

"विरोधी पक्षनेते असताना अवाजवी घरपट्टी दरवाढ मागे, घ्यावी अशी मागणी केली. त्याविरोधात सभागृहात ठरावदेखील केला. परंतु, तत्कालीन आयुक्तांच्या आडमुठे धोरणामुळे अवाजवी घरपट्टी लादली गेली. परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अवाजवी दरवाढ रद्द करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार, खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले." - अजय बोरस्ते, जिल्हा प्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT