saputara acc1.jpg 
नाशिक

वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

अशोक गवळी

बोरगाव (ता. सुरगाणा) : वडिल व त्यांची मुलगी खासगी कामासाठी नाशिकला कारने जात होते. पण कदाचित त्या पित्यालाही अंदाज नव्हता कि आपली लेकीला आता आपण शेवटचचं पाहतोय. वाटेतच काळ आडवा आला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन बसलं. काय घडले वाचा...

पिता आणि लेकीच्या समोर काळ आडवा आला...

बोरगाव येथील डॉ. प्रकाश गायकवाड व त्यांची मुलगी खासगी कामासाठी नाशिकला जात असताना घागबारी (ता. सुरगाणा) येथे चालक डॉ. गायकवाड यांचा कार (एमएच १५ सीएम ४१४५) वरील ताबा सुटल्याने गाडी आंब्याच्या झाडावर आदळली. यात कारमधील प्रज्ञा गायकवाड (वय २२) ठार झाली, तर चालक डॉ. गायकवाड (५०) जखमी झाले. प्रज्ञाच्या मृत्यूने बोरगाव व परिसरात शोककळा पसरली.

लेकीचे अंत्यसंस्कार आणि अख्खे गाव हळहळले

भांडणे (ता. कळवण) येथे त्यांच्या मूळगावी प्रज्ञावर अंतिम संस्कार करण्यात आले.  सापुतारा-बोरगाव-वणी महामार्गावरील घागबारी (ता. सुरगाणा) येथे कार झाडावर आढळून तरुणी ठार झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT