senior cc1.jpg 
नाशिक

कुटुंबातील ज्येष्ठांचे संगोपन बंधनकारकच! बहिणीच्या हक्काचे जिल्हाधिकाऱ्यांकडून रक्षण 

विनोद बेदरकर

नाशिक : निराधार बहिणीला आमिष दाखवून तिच्याकडून घेतलेले हक्कसोडपत्र आई, वडील व वरिष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियमातील कलमानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी (ता.१४) एका निकालात रद्द केले. 

ज्येष्ठांची संपत्ती लाटणाऱ्यांना चपराक 
जिल्हादंडाधिकारी म्हणून सुरू असलेल्या एका सुनावणीत मांढरे यांनी आई, वडील व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ अन्वये उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी निराधार अर्जदार बहिणीला पालनपोषणासाठी दरमहा अन्न, वस्त्राची रक्कम देण्याचे आदेश भावाला दिले होते. या आदेशावरील अपिलाच्या सुनावणीत तिच्या भावाला संधी देऊनही त्याने बहिणीची जबाबदारी स्वीकारण्यास प्रतिकूलता दर्शविली. याकाळात भावाने बहिणीसोबत चांगले बोलून भविष्यात सांभाळण्याचे आमिष दाखवून वडिलोपार्जित शेतमिळकतीचे हक्कसोडपत्र करून घेत त्यानंतर बहिणीच्या पालनपोषणास नकार दिला होता. 

सातबारा उतारेदेखील तातडीने दुरुस्त करण्याचा आदेश
ही बाब लक्षात आल्याने आई, वडील व वरिष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २३ अन्वये प्राप्त अधिकारात भावाने बहिणीकडून खोटे आमिष दाखवून करून घेतलेले हक्कसोडपत्र रद्द केले आहे; याबाबत जमिनीचे सातबारा उतारेदेखील तातडीने दुरुस्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला. जिल्ह्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच आदेश आहे. या आदेशामुळे कुटुंबातील व्यक्तीकडूनच ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसायला मदत होणार आहे. हा निकाल म्हणजे कुटुंबातील ज्येष्ठांची संपत्ती लाटून त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष 
करणाऱ्यांना दणका ठरणार आहे. 


अशा प्रकारची इतर कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्यांनी वरील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल करावा. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी)  

संपादन - ज्योती देवरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT