Triple Talaq esakal
नाशिक

Nashik Crime: माहेरवरून १ लाख रुपये आणत नाही म्हणून दिली सोडचिठ्ठी, तिहेरी तलाकप्रकरणी पतीविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : इंदिरानगर परिसरातील वडाळ्यात पत्नीस तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात मुस्लिम महिला विवाहित अधिकाराचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्रान हुसेन शेख (रा. सोनवणे मळा, पाथर्डी फाटा) असे संशयिताचे नाव आहे. (Case against husband in case of triple talaq Nashik Crime)

विवाहितेच्या फिर्यादीनुसार, विवाहानंतर पती इम्रानने शारिरीक व मानसिक छळ करीत पत्नीकडे माहेराहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर विवाहितेने तिच्या नातलगांच्या मध्यस्थीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी ती नातलगांसह गेल्या शुक्रवारी (ता.१) नाशिकला आली. चर्चेत पती इम्रान यास ‘तु मला का नांदवत नाही’ अशी विचारणा केली असता, त्यावरून वाद झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी इम्रानने तोंडी ‘तलाक, तलाक, तलाक’ असे बोलत तुझा व माझा संबंध आजपासून संपला, तुला कोणतीही भरपाई मिळणार नाही’ असे सांगितले.

त्यामुळे विवाहितेने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, शहरातील हा तिहेरी तलाकचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT