Crime esakal
नाशिक

Nashik Crime: वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद दंडे यांच्याविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : वृद्‌धाची फसवणूक केल्याप्रकरणी परिसरातील प्रसिद्ध दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case against Milind Dande for cheating old man Nashik Crime)

नाशिक, पुणे रोड येथे उड्डाणपुलाजवळील दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे (वय ५१) यांनी ८ एप्रिल २०१९ ते १० मार्च २०२३ या कालावधीत विवेकानंद शिवराम उमराणी (वय ७६, रा. गंगापूर रोड) यांना सोन्यावर ११ टक्के वाढ देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानुसार उमराणी यांनी चार वर्षांच्या कालावधीत ४४ तोळे सोन्याचा व्यवहार केला. अनेक वर्षे उलटूनही श्री. दंडे यांच्याकडून सोन्यावरील मोबदला अथवा ११ टक्के वाढ मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्री. उमराणी यांनी श्री. दंडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली.

आपली फसवणूक झाली असल्याचे श्री. उमराणी यांच्या लक्षात येताच त्यांनी हे लक्षात आल्यावर उमराणी यांनी तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मिलिंद दंडे यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT