iphone stolen inside of a car window being broken at Golf club  esakal
नाशिक

SAKAL Impact News : उपायुक्तांच्या कानउघाडणीनंतर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोल्फ क्लब मैदान येथे अज्ञात चोरट्यांनी आठ- दहा चारचाकींच्या काचा फोडून महागड्या मोबाईलसह ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु सरकारवाडा पोलिसात फक्त मोबाईल गहाळचा अर्ज तक्रारदाराकडून घेण्यात आला होता.

याप्रकरणी ‘सकाळ’ मधून वृत्त प्रसिद्ध होताच, परिमंडळ एकचे उपायुक्तांनी सरकारवाडा पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर संबंधित तक्रारदारास पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावून रीतसर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (case filed after Sakal News impact by Deputy Commissioner on theft case near golf club nashik crime news)

रविवारी (ता. २०) गोल्फ क्लब मैदानालगत आणि टिळकवाडी रस्त्यावर पहाटे अनेकांनी चारचाकी वाहने पार्क केले आणि जॉगिंग व स्वीमिंग साठी गेले. ते परतले असता, अज्ञात चोरट्यांनी आठ ते दहा चारचाकी वाहनांच्या काचा फोडून महागडे मोबाईल व वस्तू चोरून नेल्या होत्या.

यात उद्योजक महेंद्र छोरिया (रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) यांचा एक लाखांचा महागडा आयफोन चोरट्याने चोरून नेला. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितल्यानंतरही ठाणे अंमलदार असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून मोबाईल गहाळचा अर्ज लिहून घेतला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

तर त्याचवेळी गोल्फ क्लब मैदानालगतच्या कार फोडीप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ‘सकाळ’ मधून सविस्तर वृत्त प्रकाशित होऊन सरकारवाडा पोलिसांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित केले होते. याची गंभीर दखल परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी घेतली आणि सरकारवाडा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अंमलदारांची कानउघाडणी केली.

तसेच, तत्काळ तक्रारदारांना बोलावून घेत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, खडबडून जाग आलेल्या सरकारवाडा पोलिसांनी उद्योजक छोरिया यांना यांच्याशी संपर्क साधून रीतसर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक जाधव हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT