Rahul Gandhi esakal
नाशिक

Nashik News : राहुल गांधी यांच्याविरोधात दावा दाखल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

या खटल्याची पुढील सुनावणी येत्या १६ मार्च रोजी होणार आहे. (case has been filed against Rahul Gandhi in Nashik District Court nashik news)

खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी हिंगोली आणि अकोला याठिकाणी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या त्या विधानांमुळे सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या.

त्यामुळे नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी गेल्या वर्षी खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवून चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या त्या नोटिसीला कोणतेही उत्तर आले नाही.

त्यामुळे याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये अर्जदार भुतडा यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या १६ मार्च रोजी होणार आहे.

त्यानंतर, खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. भुतडा यांच्या वतीने ॲड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

''स्वा. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खासदार राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नाही. त्यामुळे न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे.''- ॲड. मनोज पिंगळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT