Filed a case against the grape trader 
नाशिक

जायखेड्यात द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; गुन्हा दाखल 

मनोहर शेवाळे

नाशिक/जायखेडा : निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतकऱ्याच्या द्राक्षांची खरेदी करून दोन लाख बासष्ट हजार रुपयांचा धनादेश न वटल्याने जायखेडा पोलीस ठाण्यात द्राक्ष व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिरमणी (ता. बागलाण) येथील धर्मा निंबाजी भदाणे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये द्राक्ष व्यापारी तनविर शहा (रा. चांदवड) या व्यापाऱ्याला सात टन द्राक्ष दिले. या द्राक्षाचे एकूण दोन लाख सत्यांशी हजार रुपये झाले. त्यात शहा यांनी भदाणे यांना पंचवीस हजार रुपये रोख व उर्वरित रकमेचा एच.डी.एफ.सी या बँकेचा खाते क्रमांक ५०२०००३३९७४१८१ चा दोन लाख रुपयांचा एक व बासष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये असे दोन चेक दिले. भदाणे यांनी दोन्ही चेक बँकेत जमा केले असता, दोन्ही चेक बाउन्स झाले. ही गोष्ट व्यापारी शहा यांना कळवत उर्वरित पैशांची मागणी केली. पण शहा यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे भदाणे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुरुवारी (ता.२९) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT