मजुराचा मृत्यु sakal
नाशिक

नाशिक : घरच्या घरीच उपचारामुळे लेकीचा मृत्यु, वडिलांविरोधात गुन्हा

विनोद बेदरकर

नाशिक : मखमलाबाद रोड वर वैद्यकिय ज्ञान नसतांना घरीच मुलीवर उपचार करुन तिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल मुलीच्या पित्यावरच गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत भारत शेटे (वय ३५, शिवगणेश अपार्टमेंट विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालय मखमलाबाद रोड) असे संशयित पित्याचे नाव आहे. त्यांनी घरच्या घरीच त्यांच्या रिया (वय १४) या स्वतःच्या मुलीवर पुरेसे वैद्यकिय ज्ञान नसतांना उपचार केले. पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, पंचवटीतील मखमलाबाद रोड येथील शिवगणेश अपार्टमेंटमध्ये अलका व हेमंत भारत शेटे हे मुलगी रिया हिच्यासह रहायला आहे. काही दिवसांपासून त्यांची मुलगी रिया आजारी असल्याने तिच्यावर वैद्यकिय उपचार सुरु होते. थोडे बरे वाटल्यावर मुलीला घरी आणल्यानंतर पुन्हा तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिचे वडील हेमंत यांनी गुरुवारी (ता.२१) दुपारी एकला घरच्या घरी सलाईन देत उपचार केल्याने त्यात तिचा मृत्यु झाल्याची मुलीच्या आईची तक्रार आहे.

हेमंत यांनी घरच्या घरी रिया हिला सलाईन व त्यात इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यु झाला असा संशयिताची पत्नी व मुलीची आई अलका शेटे याची तक्रार दिली असून याप्रकरणी त्यांनी पतीविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात वैद्यकिय ज्ञान आणि औषधोपचाराचा अनुभव नसतांना उपचार करुन मुलीच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक पी .ए. नेमाने तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT