life imprisonment latest marathi news esakal
नाशिक

इगतपुरीतील तिहेरी खुनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

नरेश हाळणोर

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील माळवाडीत चुलती, चुलत वहिनी व अवघ्या चार वर्षांच्या पुतण्यावर चाकूने वार करून निर्घृण खून (Murder) केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला होता.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती एम.व्ही. भाटिया यांनी आरोपी सचिन नामदेव चिमटे (२४, रा. चिमटे वस्ती, माळवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यास तीन खुन व प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा व ३ लाखांच्या दंड ठोठावला. (case of triple murder in Igatpuri accused was sentenced to life imprisonment nashik crime latest Marathi news)

हिराबाई शंकर चिमटे (५५), मंगला गणेश चिमटे (३०), रोहीत गणेश चिमटे (४, सर्व रा. चिमटे वस्ती, माळवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) या तिघांच्या निर्घृण खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज निकाल दिला.

सदरील तिहेरी खुनाची घटना ३० जून २०१८ रोजी सकाळी साडेनऊ-दहा वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपी सचिन चिमटे हा मयत हिराबाई यांचा पुतण्या होता. मिळकतीचा वाद व सतत टोमणे मारत असल्याच्या कारणावरून आरोपी सचिन याने वहिनी मंगला यांच्या गळ्यावर चाकूने वार केले.

त्यानंतर त्याने वयोवृद्ध चुलती हिराबाई यांच्याही गळ्यावर वार केले. यावेळी तेथे असलेला चार वर्षांच्या रोहितच्याही गळ्यावर करून तिघांचा खून केला. त्याठिकाणी सहा वर्षांचा यशही होता. सदरची घटना पाहून तो पळत असताना त्याच्यावरही आरोपी सचिन याने प्राणघातक हल्ला केला होता.

जखमी अवस्थेत रोहीत रस्त्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचला. त्यावेळी नागरिकांनी चिमटे वस्तीकडे धाव घेत आरोपी सचिनला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सदरील गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांनी करीत जिल्हा न्यायालयात पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले.

सदरील खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती एम.व्ही. भाटिया यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी ठोस पुरावे, १२ साक्षीदार व तांत्रिक माहिती सादर केली.

या पुराव्यांच्या आधारे न्या. श्रीमती भाटिया यांनी आरोपी सचिन चिमटे यास प्रत्येक खुनात जन्मठेप अशाप्रकारे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम मयतांच्या नातलगांना देण्याचेही आदेश सत्र न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT