fraud Crime News esakal
नाशिक

Job Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने फसवणाऱ्या दोघां बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी दोन सख्ख्या बहिणींवर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरबाज सलीम शेख (रा. खडकाळी) याने ३ सप्टेंबरला संशयित तरुणींविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची चौकशी होऊन सोमवार (ता.१०) एक महिन्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

अरबाज शेख याने गेल्या महिन्यात संशयित तरुणी फरीण जुल्फीकार शेख आणि जकीया जुल्फीकार शेख दोघींविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांकडून अर्जाची चौकशी करण्यात आली. खात्री झाल्यानंतर सोमवारी दोघींवर गुन्हा दाखल केला. (case registered against two sisters who cheated with lure of job Nashik Latest Crime News)

फरीण हिने ती स्वतः शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णालयाचे बनावट ओळखपत्र दाखविले. नोकरीसाठी दोन लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यातून वेळोवेळी त्याने दीड लाख रुपये तिला दिले. नोकरी न लागल्यास दोन दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. एक-दोन दिवसांनी नोकरीची ऑर्डर मिळणार असल्याचे सांगितले. सांगितलेल्या वेळेत ऑर्डर न मिळाल्याने तिसऱ्या दिवशी पैसे परत मागण्यासाठी संपर्क साधला.

खूप विनवण्या केल्यानंतर तिने पे फोनच्या माध्यमातून ३० हजारांची रक्कम परत केली. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी संपर्क करता उडवाउडवीचे उत्तर दिले. काही दिवसांनी फोन उचलणे देखील बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरबाजने भद्रकाली पोलिसांशी संपर्क साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT