Road Name Plate esakal
नाशिक

Nashik News: नाशिक विभागामधील 2 हजार 904 वाड्यांसह वस्त्या अन रस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला.

त्या अनुषंगाने नाशिक विभागात २ हजार ९०० हून अधिक जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहे. विभागाचे हे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

विभागीय आयुक्तालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या विभागीय समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर आनुषंगिक विषयांचा आढावा बैठक झाली.

यावेळी श्री. गमे बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ आदी उपस्थित होते.

जातिवाचक नावे बदलण्यात आलेल्यांमध्ये महापालिका क्षेत्रातील १६९, नगरपालिका क्षेत्रातील २६६ व ग्रामपंचायत क्षेत्रातील २ हजार ४६९ ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तृतीयपंथी कल्याण समितीच्या बैठकीत तृतीयपंथीयांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्याचे व त्यांच्यासाठी ओळखपत्र वाटप करण्यासाठी शिबिर घेण्याचे निर्देश श्री. गमे यांनी दिले.

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा जिल्हावार आढावा घेण्यात आला. अत्याचारग्रस्तांना देण्यात आले अर्थसहाय व त्यासंबंधीच्या उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे श्री. गमे यांनी सूचित केले.

तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने याबाबत व्यापकस्तरावर जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असेही श्री. गमे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT