truck at night 1.jpg
truck at night 1.jpg 
नाशिक

धक्कादायक! कत्तलीसाठी 'त्यांना' केले बेशुध्द...पिकअपमधल्या विदारक चित्राचा खुलासा..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / अस्वली स्टेशन : सायंकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव मोखाडा-वैतरणा मार्गे येणारी पिकअप दबा धरून बसलेल्या पोलिसांना दिसताच थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुसाट वेगाने चालकाने वाहन पुढे पळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीसांनी मात्र...

वाहनाची झडती घेताच झाला धक्कादायक खुलासा

गोपनीय सूत्रांनी कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याची माहिती दिल्यानुसार पोलीस हवालदार अशोक कोरडे, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, रामकृष्ण लहामटे यांनी वाकी शिवारात सापळा रचून वाहनाची वाट पाहत होते. सायंकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव मोखाडा-वैतरणा मार्गे येणारी पिकअप (एमएच १५  बीके- ६३३७) दबा धरून बसलेल्या पोलिसांना दिसताच थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुसाट वेगाने वाहन पुढे पळवण्याचा प्रयत्न करत असताना इतर ठिकाणी दबा धरून बसलेल्या साध्या वेषातील पोलिसांनी वाहन आडवे लावत वाहनचालक सुमित लाजसा खरात (वय २८, रा. कुरणरोड, संगमनेर) यास वाहनाची झडती घेत पोलिसी खाक्या दाखवत कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा परवाना व वैद्यकीय अहवाल मागितला. मात्र, आपण मोखाडा पुलाची वाडी येथून कत्तलीसाठी नेत असल्याचे कबूल केले. वाहनात पाय बांधून इजा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने तीन गाई व तीन वासरे यांसह पिकअप असा चार लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष दोंदे करत आहेत.
 

कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा

मोखाडे मार्गे संगमनेरकडे जाणाऱ्या वाहनाची पोलिसांनी बुधवारी  सायंकाळी साडेआठ वाजता वाकी (ता. इगतपुरी) शिवारात तपासणी केली असता कत्तलीसाठी बेशुद्ध करत पाय बांधून गाई नेल्या जात असल्याचे दिसून आले. संबंधितांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT