CCTV cameras will be installed at this place of Nandini river. esakal
नाशिक

Nashik News : नंदिनी प्रदूषणावर CCTVची नजर; स्मार्टसिटीकडून पत्र

विक्रांत मते

नाशिक : गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीचे प्रदूषण होवू नये तसेच नदीच्या किनारी झाडाझुडपांचा आसरा घेऊन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी उंटवाडी ते गोविंदनगर दरम्यान दहा महत्त्वाच्या ठिकाणी २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे.

यासंदर्भात स्मार्टसिटी कंपनीने सत्कार्य फाउंडेशनच्या पत्राला लेखी उत्तर दिले. (CCTV eyes on Nandini pollution Letter from SmartCity Nashik NMC News)

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना व सत्कार्य फाउंडेशनचे चारुशिला व बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी स्मार्टसिटी कंपनीकडे पत्रव्यवहार केला होता. गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकून प्रदूषण केले जाते.

नदी पात्रातून वाळू उपसा सुरू आहे. मद्यपीकडून नदी किनारी उद्योग सुरू असतात, तर गुन्हेगार लपण्यासाठी आश्रय घेतात. गुन्हेगारीचा सर्वसामान्यांना त्रास होतो. कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी दोन वर्षांपूर्वी पत्राद्वारे करण्यात आली. सप्टेंबर २०२२ च्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. गोविंदनगर ते उंटवाडीपर्यंत दोन्ही किनारी एकूण दहा ठिकाणी २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित झाले असून, याबाबतचा स्थळ पाहणी तांत्रिक अहवाल स्मार्टसिटीला ठेकेदाराने दिला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

ठाकरे व शिंदे गट आमने-सामने

प्रभाग २४ मध्ये ठाकरे गट व शिंदे गट विकासकामांवरून आमने-सामने आला आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनकडून विविध विकासकामे करण्यात आली.

त्याचे फुकटचे श्रेय काहीजण लाटण्याचा प्रयत्न करत असून, काही कामे मंजूर होवू नये, त्यांची वर्कऑर्डर निघू नये, मंजूर काम सुरू होवू नये, सुरू झालेले काम बंद करण्याचे उद्योग सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.

राजकीय आकसापोटी केले जात आहेत. नंदिनीचे हे काम थांबण्यासाठी संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पर्यावरणप्रेमी व प्रभागातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT