Ganesh Pelmahale while installing CCTV at police post Choupuli. esakal
नाशिक

Nashik News : प्रभाग एकमध्ये जागोजागी CCTV!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : शहरात गुन्हेगारी दिवसागणिक वाढत आहे. त्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे अपेक्षित आहेत. पण, या कामाला अद्याप वेग नाही. हे ओळखून येथील म्हसरूळ शिवारातील एका सामाजिक कार्यकर्त्याने प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वखर्चाने काही परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. (CCTV in place in ward one Nashik News)

प्रभाग एक म्हसरूळ शिवाराचा विकास झपाट्याने होत असून लोकवस्ती वाढली आहे. मेरी - म्हसरूळ परिसरातील वाढती गुन्हेगारी व सोनसाखळी चोरी मुळे महिला व नागरिक त्रस्त व भीतीचे वातावरण झाले होते.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले यांनी स्वखर्चातून असे एकूण तीन लाख साठ्ठ हजार रुपयांचे एकूण पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. ज्यामुळे गुन्हेगारी व सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

बोरगड, एकतानगर, पुष्पकनगर, कंनसरा चौक, हनुमान चौक पेठ रोड, साई संदेश चौक म्हसरूळ लिंक रोड, अनुराधा कॉलनी, गुलमोहरनगर, म्हसरूळ गाव, चौफुली दिंडोरी रोड, महालक्ष्मी मंदिर, म्हसरूळ गाव दत्तमंदिर परिसर, हरिहर नगर, ओंकारनगर, वृंदावननगर, स्नेहनगर, सावरकरनगर व गार्डन परिसर, वडजे मळा, छत्रपती शिवाजी महाराजनगर शनिमंदिर परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

"प्रभाग सुरक्षाअंतर्गत मेरी म्हसरूळ परिसरात पाचशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे मानस आहे. महापालिका प्रशासनाने विद्युत प्रवाह नियोजन करून देण्यास मदत करावी. आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्य करावे तेव्हाच आपले नाशिक गुन्हेगारी व भयमुक्त नाशिक होईल." - गणेश पेलमहाले, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT