celebration in BJP office over winning Assembly Elections 2023 Result nashik news 
नाशिक

Assembly Elections 2023 Result : नाशिक भाजपा कार्यालयात विजयाचा जल्लोष; ढोलताशांवर नाचले पदाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

Assembly Elections 2023 Result : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजपाने बहुमत मिळविले.

या विजयाचा आनंदोत्सव एन डी पटेल रोडवरील भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ढोलताशाच्या तालावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थिरकत जल्लोष केला. त्यानंतर पेढयांचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. (celebration in BJP office over winning Assembly Elections 2023 Result nashik news)

राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून लावली तर मध्यप्रदेशमध्ये आपली सत्ता कायम राखत भाजपाने सत्तेच्या जवळ पोहोचली आहे. या तीनही राज्यांमध्ये गेल्या दोन म.िहन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मध्यप्रदेशात गेल्या महिन्यात २५ तर, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये गेल्या १ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश या उत्तर भारतातील मोठ्या राज्यांमध्ये भाजपाचे मोठा विजय मिळविला आहे.

त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी नाशिकच्या एन.डी. पटेल रोडवरील शहर भाजपा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी ढोलताशांच्या आवाजात पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.

तसेच, मिठाई, पेढ्यांचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, विजय साने, माजी महापौर सतिश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, ॲड. शाम बडोदे, अविनाश पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस माधुरी पालवे-पडार, अविनाश पाटील, धनंजय माने, राकेश डोमसे, स्मीता बोडके, अमित घुगे, शाहीन मिर्झा, गुलाब सईद, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, अमोल पाटील, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, अरुण शेंदुर्णीकर, ॲड. श्रीधर व्यवहारे, हेमंत शुक्ल, राजेद्र महाले, अजिंक्य साने, सोनाली ठाकरे, प्रकाश जडे, अमोल गांगुर्डे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT