nmc2.jpg
nmc2.jpg 
नाशिक

अभिमानास्पद! नाशिक पॅटर्नचा देशात बोलबाला...केंद्र सरकारकडून पाठीवर कौतुकाची थाप

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची दखल केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने घेतली आहे. महापालिकेच्या कामाचे कौतुक करताना इतर महापालिकांनीही कोविडचा सामना करण्यासाठी अंमलबजावणी करण्याचे सूचित केले आहे. 

नाशिक पॅटर्न देशात पोचला

मार्चच्या प्रारंभी कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला. मुंबई, पुणे शहरात प्रादुर्भाव वाढत असताना नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या. त्या उपाययोजना संपूर्ण राज्यात रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जात आहेत. राज्य सरकारने या उपाययोजनांची दाखल घेतली. त्यापाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त गमे यांचे कौतुक केले. आता केंद्र सरकारने महापालिकेच्या मास्टर प्लॅनची दखल घेतल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचा नाशिक पॅटर्न देशात पोचला आहे. 

या बाबी ठरल्या महत्त्वाच्या 

-आठ ट्रॅक्‍टरद्वारे 75 किलोमीटर रस्त्याचे निर्जंतुकीकरण 
-36 चौरस किलोमीटर क्षेत्रात सुविधा 
-287 मलेरिया कर्मचाऱ्यांकडून 109 किलोमीटर क्षेत्रात औषधफवारणी 
-748 मेडिकल ऑफिसर व एक हजार 500 सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोव्हज, सॅनिटायझर सुविधा 
-कोरोना संरक्षणासाठी 14 संस्थात्मक वॉर्ड व त्यात 72 बेडची सुविधा 
-प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय पथकांची नियुक्ती 
-स्मार्टफोनवर महाकवच ऍप उपलब्ध करून देणे 
-नाशिक बाजार ऍपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन भाजीपाला उपलब्ध करून देणे 

-एनएमसी कोविड ऍपद्वारे 11 प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे 
-चोवीस तास हेल्पलाइन डेस्क सुविधा उपलब्ध करून देणे 
-कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून कोविड 19 रुग्णांचे निरीक्षण करणे 
-महापालिका रुग्णालयातील डॉक्‍टरांना रुग्ण तपासण्यासाठी एरोसेन पेटी उपलब्ध करून देणे 
-कोविड-19 रुग्ण ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यासाठी सर्वेक्षण 
-गर्दी टाळण्यासाठी 106 भाजी मार्केटची निर्मिती 
-नागरिकांना थेट भाजीपाला घरपोच देण्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीकडून साखळी 
-डॉक्‍टर आपल्या दारी उपक्रम राबविणे  


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT