भाजपच्या आयटी पार्कला केंद्र सरकारचा बूस्ट
भाजपच्या आयटी पार्कला केंद्र सरकारचा बूस्ट sakal
नाशिक

नाशिक : भाजपच्या आयटी पार्कला केंद्र सरकारचा बूस्ट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्ताधारी भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या  आयटी  पार्कला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारला सादर झाला. यानंतर आयटी पार्कमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या लघुउद्योग मंत्रालयाने प्रकल्पावर शिक्कामोर्तब करत भाजपच्या प्रकल्पाला बुस्ट दिला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११०३ पैकी मधील दहा एकर जागेसह सर्व्हे क्रमांक ११०३, ११०१, ११०४, ११०५, ११०६, ११०९, १११०, ११११, १११२ व म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक ९३ ते ९५, ९७, ९८ व १०३ या ना विकास क्षेत्रात  आयटी  पार्कचा प्रस्ताव स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर- आडके यांनी महासभेवर ठेवला होता. महापौर सतीश कुलकर्णी यांनी चर्चेअंती प्रस्तावाला मंजुरी देताना डिसेंबरअखेर आयटी कंपन्यांच्या तज्ज्ञांची बैठक घेणार असल्याचे जाहीर केले होते.

प्रस्तावाला मंजुरी देताना आयटी पार्कसाठी चालू अंदाजपत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुढील वर्ष बचतीमधील रक्कम पार्क विकसित करण्यासाठी लावली जाणार आहे. आयटी पार्कच्या जागेत तीस मीटरचे रस्ते विकसित करणे, मार्केट, शॉपिंग सेंटर, पाण्याची सुविधा, बस टर्मिनल आदी प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनेलवरील विवेक जायखेडकर, विजय सांखला, धनंजय शिंदे, विजय अग्रवाल, नितीन कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयटी कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तार होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक मागील आठवड्यात पार पडली. या वेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यानुसार राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर झाला असून त्यात सुविधा पुरविण्यासाठी विशेष उद्देश वहन स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आयटी पार्कसाठी महत्त्वाचे

आयटी पार्कसाठी महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त कॉमन फॅसिलिटी सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेंटर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स फोर एग्रीटेक, फिनटेक, प्रॉडक्ट गॅलरी, इनक्युबेशन सेंटर आदी सुविधा असलेले प्लग ॲन्ड प्ले सॅटेलाईट अर्थात बहुउद्देशीय केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या मध्यम व लघु मंत्रालयाकडून निधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

"महापालिका क्षेत्रात ३०० लहान-मोठ्या आयटी कंपन्या असून, त्यांना सवलती मिळत नाही. नाशिकमधून आयटी उद्योगातील  युवक- युवती मुंबई, पुण्यात  आयटी  क्षेत्रात कामासाठी जातात. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न आहेत."

- सतीश कुलकर्णी, महापौर

"लोकप्रतिनिधीबरोबरच आयटी इंजिनिअर असल्याने आपल्या शहरात आयटी प्रकल्प असावे, यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारने विशेष उद्देश वहन स्थापन करण्यास परवानगी दिल्याने प्रकल्प पूर्णत्वाचे स्वप्न दृष्टिपथात येत आहे."

- हिमगौरी आहेर-आडके, नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT