Onion auction held on Wednesday in the market committee.  esakal
नाशिक

Nashik Onion Rate Fall : कांदा गडगडला; 33 रुपयेप्रति किलोवरून 16 रुपयांनी विकण्याची वेळ

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढताच केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला अन्‌ बाजारात कांदा कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate Fall : किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढताच केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला अन्‌ बाजारात कांदा कोसळला. लाल कांदा १६०० रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जवळपास १८ दिवसांत कांदा निम्याहून अधिक दराने कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.(central government decided to ban exports and onion collapsed in market nashik news)

घाऊक बाजार ३४ रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखविली होती. निर्यातबंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे. पुढील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील कांदा येईल. त्यामुळे आता दर आणखी घसरतील, अशी शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत पुन्हा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली आहे.

येथील बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये, सरासरी १६००, तर जास्तीत जास्त १, ७७२ रुपये भाव मिळाला. कांद्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड यापुढेही कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा मिळाला आहे.

कांदा निर्यातबंदी प्रश्नी राज्यवापी महामेळावा

कांदा निर्यातबंदी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटनांतर्फे जानेवारी महिन्यात ३० एकर जागेत राज्यवापी महामेळावा होणार आहे.

त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. यामुळे नवीन वर्षातही कांदा प्रश्न आणखी भडकणार असल्याचे दिसत आहे.

''उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेत पुन्हा इथेनॉलनिर्मितीला परवानगी दिली आहे. अशाच पद्धतीने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीबंदी उठवावी.''-निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव साळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT