bhusawal oxygen esakal
नाशिक

भुसावळला मध्य रेल्वेचा पहिला ऑक्सिजन प्लांट

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : कोरोना महामारीत (corona virus) मध्य रेल्वेने (central railway) पहिला ऑक्सिजन प्लांट भुसावळला (oxygen plant at bhusawal) कार्यान्वित केला असून, रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह प्रवाशांना ऑक्सिजन प्लांटचा गरजेनुसार वापर होणार आहे. मध्य रेल्वे व भुसावळ विभागात हा पहिला ऑक्सिजन प्रकल्प आहे. (Central Railway first oxygen plant at Bhusawal)

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष कोविड कक्ष

भुसावळ मंडलात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष कोविड कक्ष बनविला आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी उत्तम घेतली जाईल. कोविड कक्षात १२८ ऑक्सिजन बेड आहेत. कक्षात रुग्णांवर उपचार व्यवस्थित करून त्यांची उत्तम प्रकारे सोय केली जाते. या प्लांटमुळे ऑक्सिजनची कमतरता हॉस्पिटल आणि कोविड रुग्णांना होणार नाही आणि रेल्वेला बाहेरून ऑक्सिजन विकत आणावा लागणार नाही. ऑक्सिजन प्लांटमधून ९१ लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. हा प्लांट २ नोव्हेंबर २०२० ला सुरू करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे २० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रिफिल केले जाऊ शकतात. यामुळे रेल्वे हॉस्पिटलला कधीही ऑक्सिजनची गरज भासली नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भरती करण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत त्याची काळजी घेतली जाते. त्यांच्या मनापासून भीती काढून योग्य प्रकारे उपचार केले जातात.

वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी त्याची देखभाल करतात आणि यामुळेच रुग्णाचा रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे. आतापर्यंत रेल्वे हॉस्पिटलमध्ये तीन हजार ३१३ रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी सुखरूप आले आहेत. यात ४४५ रुग्ण बाहेरील आणि दोन हजार ८६८ रुग्ण रेल्वेतील आहेत. गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेऊन रोज चौकशी करून औषधांचे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT