11th online admission esakal
नाशिक

अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेचे सूत्र निश्‍चित

महेंद्र महाजन

नाशिक : दहावीची परीक्षा (ssc exam) रद्द करण्यात आली असली, तरीही मूल्यांकनाच्या नियमांच्या आधारे १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल राज्य सरकारला अपेक्षित आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचे सूत्र शालेय शिक्षण विभागाने निश्‍चित केले आहे. मात्र सीईटी ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. तरीही शहरांमध्ये यापूर्वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालयांना या परीक्षेच्या आधारे प्रवेश द्यावे लागतील. (CET-formula-fixed-for-eleventh-admission-marathi-news)

परीक्षा ऐच्छिक असली, तरी शहरांमध्ये घ्यावी लागणार

सीईटी परीक्षा दहावीचा निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांत म्हणजे जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सीईटी गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्राधान्य देण्यात येईल. अकरावीच्या प्रवेशात पहिल्या टप्प्यात सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क दिले असल्याने विद्यार्थ्यांना ‘सीईटी’साठी शुल्क भरावे लागणार नाही. तरीही सीबीएसई, सीआयएससीई, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांकडून घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी राज्य मंडळाकडून अथवा परीक्षा परिषदेकडून शुल्क देण्यात येईल.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

सीईटी परीक्षेसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, बालभारतीचे संचालक, परीक्षा परिषदेचे आयुक्त समितीचे सदस्य असतील, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक सचिव असतील. अकरावी प्रवेशासाठी सीईटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी घ्यायची आहे. सीईटी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सीईटीच्या प्रश्‍नपत्रिका इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्‍न असतील. परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल. प्रश्‍नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल. ओएमआर आधारित सीईटी असेल. सीईटी परीक्षेसाठी शंभर गुणांची एकच प्रश्‍नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ तथा परीक्षा परिषदेतर्फे संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी सीईटीला प्रविष्ट होण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

३२ टक्के जागा नेमक्या कुठं उपलब्ध?

अकरावीच्या २०२०-२१ मध्ये ऑनलाइन प्रवेशासंबंधीच्या जागांवरून ३२ टक्के जागा रिक्त राहिल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून या जागा नेमक्या कुठं उपलब्ध आहेत, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात रिक्त जागा राहिल्याचे सांगण्यात येत आहे. अकरावीसाठीच्या २०२०-२१ मधील जागांची स्थिती अशी ः

विभाग प्रवेश क्षमता विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष प्रवेश रिक्त जागांची टक्केवारी

अमरावती १५ हजार ३६० १३ हजार २६४ १० हजार ९५० २८.७१

औरंगाबाद ३१ हजार ४७० २१ हजार ७९१ १६ हजार ९४८ ४६.१५

मुंबई ३ लाख २० हजार ७७९ २ लाख ६० हजार ३२६ २ लाख ४६ हजार ६९५ २९.९५

नागपूर ५९ हजार २५० ३९ हजार ३६९ ३४ हजार ८३४ ४१.२१

नाशिक २५ हजार २७० २६ हजार ८९१ १९ हजार ७१२ २१.९९

पुणे १ लाख ७ हजार २१५ ८७ हजार ४१४ ७१ हजार ७२२ ३३.१

एकूण ५ लाख ५९ हजार ३४४ ४ लाख ४९ हजार ५५ ३ लाख ७८ हजार ८६१ ३२.२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT