Sanjay Gaikhe and Shaila Gaikhe sang while felicitating the newly elected Sarpanch Vinayak Kharat. esakal
नाशिक

Nashik News : चांदोरीच्या राजकारणात सुसंस्कृतपणाचे दर्शन! विजयानंतर खरातांनी घेतला गायखेंचा आर्शिवाद

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : ग्रामपालिकांच्या निवडणुकीत इतर ठिकाणी हार जीत झाल्यानंतर वादाचे गालबोट लागले जाते. असेच राजकीय दृष्टीने संवेदनशील असलेल्या चांदोरीमध्ये मात्र या निवडणुकीनंतर उमेदवारांकडून राजकीय खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली. सरपंचपदी विनायक खरात यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी विरोधी उमेदवार संजय गायखे यांच्या निवासस्थानी जाऊन आर्शीवाद घेत सुसंस्कृतपणाच दर्शन दाखविले. (Chandori shows ideal politics after winning gram panchayat election Kharat took blessings of opposition Gaikhe Nashik News )

निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत लढतींपैकी एक लढत होती ती चांदोरी मधील सेना पुरस्कृत श्री गणेश ग्रामविकास पॅनलचे विनायक खरात व राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलच्या संजय गायखे यांच्यात. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनायक खरात यांनी संजय गायखे यांचा पराभव केला. गट, कुळ यासह टीका टिपण्णी यासह विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजली होती. त्यानंतर ग्रामपालिका निवडणुकीचे निकाल लागले. यात चांदोरी - नागापूर ग्रामपालिकेवर सेनेची सत्ता येणार हे ११ जागा विजयी झाल्यानंतर निश्चित झाले.

नवनिर्वाचित सरपंच विनायक खरात यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवत राजकीय सभ्यतेचे दर्शन घडवले. विनायक खरात यांनी विजय मिळविल्यानंतर संजय गायखे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

संजय गायखे यांच्या कुटुंबीयांनी देखील सुसंस्कृतपणा दाखवत विनायक खरात यांचे स्वागत तसेच मानपान दिला. या प्रसंगी विनायक खरात म्हणाले आशीर्वाद असुद्या, विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र रहावं.

"पराभवाचे शल्य मनात न बाळगता विकासासाठी सोबत असताना सामाजिक कामही चालूच राहील." - संजय गायखे, चांदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

SCROLL FOR NEXT