Chandrasekhar Bawankule statement of Maharashtra lags behind in development due to Uddhav Thackerays ego nashik news esakal
नाशिक

Nashik News : ‘उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे महाराष्ट्र विकासात मागे’ : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला. देण्याची मानसिकता होती. परंतु, घेण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात विकासकामे थांबली होती. उद्धव ठाकरे यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला.

देण्याची मानसिकता होती. परंतु, घेण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला. ( Chandrasekhar Bawankule statement of Maharashtra lags behind in development due to Uddhav Thackerays ego nashik news )

ठाकरेंना मोठा इगो होता. ते कधीच पंतप्रधान मोदींकडे गेले नाहीत. आजच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी मोदींकडे जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी विकासकामे होत असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे शुक्रवारी (ता. १२) सकाळी नाशिक येथे आगमन झाले. त्या वेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांचा नाशिक दौरा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला फायदेशीर ठरणार आहे. या दौऱ्यातून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राला मोठी गती मिळाली असून, गतिमान झाला आहे.

अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील विकास थांबला होता. आता पुन्हा आपल्या विचारांचे सरकार आल्याने मोदी यांनी महाराष्ट्राला खूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरेंना इगो होता.

त्यामुळे विकासाच्या कामासाठी देखील दिल्लीत मोदी यांच्याकडे कोणी जात नव्हते. मात्र, आज सर्व एकत्रितपणे विकासासाठी मोदी यांच्याकडे जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. बावनकुळे म्हणाले, की स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. यात राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे. हे कशामुळे होते, एकत्र राहिलो तर सगळे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीची चर्चा नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. मोदींकडे अजून महाराष्ट्रासाठी काय मागता येईल, महाराष्ट्राचा अजून काय विकास करता येईल, हीच चर्चा तिन्ही नेत्यांमध्ये विमानात झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT