Chandrashekhar Bawankule statement about uddhav thackeray and sharad pawar nashik news esakal
नाशिक

Chandrashekhar Bawankule News : पवार व ठाकरेंनी इंडिया आघाडी सोडावी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना इंडिया आघाडी सोडण्याचा सल्ला दिला.

इंडिया आघाडी सोडायची नसेल तर हिंदू धर्म व संस्कृतीविषयी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी यांनी केलेले वक्तव्य मान्य असल्याचे तरी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपच्या लोकसभा महाविजय अभियानासाठी ते नाशिकमध्ये आले असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. (Chandrashekhar Bawankule statement about uddhav thackeray and sharad pawar nashik news)

ते म्हणाले, की तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी यांनी तमिळनाडूमध्ये हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीविषयी केलेल्या वक्तव्याला शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे समर्थन असावे. मान्य नसेल तर त्या वक्तव्याचा निषेध करीत इंडिया आघाडी सोडावी. सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार मांडीला मांडी लावून बसत आहेत.

भाजपचा ४५ प्लसचा नारा

लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी महायुतीच्या आघाडीतील पक्षांशी बोलणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कालखंडात तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षांतील व शिंदे यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळातील लोकाभिमुख कामांची शिदोरी आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत.

संघटनात्मक बांधणी करून लोकसभा निवडणुकीत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. जागावाटपाचा निर्णय पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल. जागावाटपाबाबत चर्चेतूनच तोडगा काढला जाईल.

खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांना दिवसा स्वप्न दिसतात, असा टोला श्री. बावनकुळे यांनी लगावला. खासदार शिंदे हे प्रभावी आहेत, ते ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन पुन्हा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

वक्तव्याचे राजकारण नको

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे, तिला उत्तर देण्यास त्या सक्षम आहेत. अशा नोटिसा रद्दही होतात. पालकमंत्रिपदासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही.

पालकमंत्रिपद जाहीर करण्याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. अजित पवार जे काही बोलतात, त्यांचे बोलणे हे नैसर्गिक आहे, त्यांच्या वक्तव्याचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

बावनकुळे यांची सारवासारव

नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावर आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सारवासारव केली. पत्रकार हे समाजातील सन्माननीय घटक आहेत.

चुकीची बातमी प्रसिद्ध होऊ नये, यासाठी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बाजू योग्य रीतीने समजावून सांगावी. पत्रकार समाजाचे मत परिवर्तन घडवू शकतात, यासाठीच मी पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. त्यात काही गैर नाही, असेही समर्थन बावनकुळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT