chandwad onion.jpg 
नाशिक

'इथं' कांदा लिलाव थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर...शेतकऱ्यांसाठी घेतला निर्णय

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (चांदवड) तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान होऊ नये, कांदा विक्रीसाठी गैरसोय होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांशी संपर्क करून व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे व बाजार समिती प्रशासनाने केले आहे. 

सोशल डिस्टन्सिंग व तोंडाला मास्क आवश्यक

चांदवड शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला भाग कटेन्मेंट झोन, तसेच त्यालगत असलेल्या परिसराला बफर झोन घोषित केले आहे. त्यावरून शुक्रवारी (ता. 17) बाजार समितीचे संचालक व कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. तीत शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी गैरसोय होऊ नये. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी बाजार समितीच्या आवारात लिलाव न करता पुढील निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांशी संपर्क करून व्यापाऱ्यांच्या खळ्यावर कांदा विक्री करावा, असे ठरविण्यात आले. कांदा विक्री सोमवार ते शनिवारी दैनंदिन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेतच सुरू राहील. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून कांदा लिलाव करावा व भाव ठरवावा. शेतकऱ्याला योग्य वाटल्यास त्यांनी त्या व्यापाऱ्यास कांदा विक्री करावा अन्यथा इतर व्यापाऱ्याशी चर्चा करावी. कांदा विक्रीस आणल्यानंतर शेतकऱ्यांनी डिस्टन्सिंग व तोंडाला मास्क व रुमाल बांधावा. 

देखरेख करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणार

बाजार समितीतर्फे प्रत्येक व्यापारी खळ्यावर मापारी काटा पट्टी बनविण्यासाठी व कांदा खाली करण्यासाठी हमाल राहतील. या सर्व व्यवहारावर बाजार समिती देखरेख करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणार आहे. कांदा विक्रीसंदर्भात काही अधिक माहितीसाठी बाजार समितीशी संपर्क साधावा. सर्व शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची रक्कम रोख अथवा आरटीजीएसद्वारे त्याच दिवशी घ्यावी. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी आदींनी योग्य ती खबरदारी घेऊन बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर व संचालकांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT