chandwad acc.jpg 
नाशिक

PHOTOS : भीषण! अख्ख्या कुटुंबावर काळाची झडप...ट्रॅक्टरचा अक्षरश: चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / चांदवड : चांदवड-देवळा मार्गावरील भावड घाटात आज दुपारी अज्ञात वाहनाने ट्रॅकटरला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने शेताकडे जात असतानाच...

नव्याने घेतलेल्या जमिनीकडे अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. चांदवड तालुक्यातील पुरी येथील मधुकर शंकर भवर यांनी देवळाजवळ शेती घेतली आहे. या शेतीला पाहण्यासाठी भवर कुटुंबातील 9 जण एका ट्रॅक्टरवर जात असताना भावडी घाटाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या ट्रॅक्टरला जबर धडक दिली.

भीषण अपघात..

अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचा पुढचा भाग चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरवरील 9 पैकी 3 जणांचा जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्यात भवर यांचा मुलगा विजय, सुन सुनिता,नातू सोन्या आणि त्यांचे व्याही भाऊसाहेब काळे यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यावर देवळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Naxal Surrender News: गडचिरोली सुरक्षा दलांसमोर ११ वरिष्ठ माओवाद्यांची शरणागती; सुरक्षा यंत्रणा ठरतेय यशस्वी, आता उरले केवळ सहा!

Latest Marathi News Live Update : अमडापूर टोल प्लाझावर एसटी बसचा अपघात; ४ ते ५ प्रवासी जखमी

kokan Rehabilitation : कोयना प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला! न्यायासाठी आता न्यायालयाची दारं ठोठावणार

Latur News: निलंगा वांजरखेडा व सिंधीकामठ बंधाऱ्यांना उच्च पातळी बंधारा; १२३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT