Nandini River File Photo esakal
नाशिक

Nashik News: नंदिनी नदीच्या पूररेषेत बदल, शेतकरी संतप्त!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : २००८ मध्ये गोदावरीसह उपनद्यांना आलेल्या पुरामुळे पाटबंधारे विभागाने आखून दिलेली निळी व लाल रेषा नंदिनी नदीसाठी बदलण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.

पूररेषेचे सर्वेक्षण करून सर्वांना एकाच वेळी न्याय अपेक्षित असताना जलसंपदा खाते व महापालिकेच्या नगररचना विभागाने बिल्डर व गुंतवणूकदारांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा आरोप शेतकरी कृती समितीने केला.

यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना निवेदन देण्यात आले. (Change in flood line of Nandini river farmers angry Nashik News)

नासर्डी नदी किनारी मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. परंतु बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा विचार करून नंदिनी नदीची पूररेषा छोटी केली. नदीची लांबी १४ किलोमीटर आहे.

२००६ पूर्वी नंदिनी नदीवर मोठ्या प्रमाणात पूल व बंधारे असल्याने जलसंपदा विभागाने सर्वेक्षण करून शेत जमिनींवर पूररेषा टाकली. एकीकडे पूररेषा टाकताना नदीवरील छोटे पूल व बंधारे हटविले.

पुराचे प्रमाण घटल्याने पूररेषादेखील कमी झाली. त्यामुळे पूररेषा हटवायची असेल तर सरसकट पूररेषा कमी करण्याऐवजी बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा विचार करून सातपूर गावातील दोन किलोमीटर अंतरावरीलच पूररेषा कमी केली.

छोट्या शेतकऱ्यांचे शेत बाधित होणारे क्षेत्र पूर्वीच्याच पूररेषेप्रमाणे ठेवले आहे. याचा अर्थ त्या शेतकऱ्यांना पूररेषेच्या क्षेत्रात कुठलेच काम करता येणार नाही.

महापालिका, जलसंपदा विभागाने नंदिनी नदी लगतच्या पूररेषेचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

गोकुळ निगळ, सुनील मौले, शांताराम निगळ, दशरथ निगळ, वाळू निगळ, राजू निगळ, निवृत्ती काशीब्रे, संपत घाटोळ, सुरेश गोवर्धने, गिरीश गोवर्धने, राकेश काशीभ्रे, रूपचंद गोवर्धने, संतोष निगळ, राजाराम निगळ यांनी निवेदन दिले.

या सर्वे क्रमांकात झाले बदल

उजव्या तीरावरील : ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२४, ४२५, ४२९, ४३०, ४६१, ४६२, ४६४, ४६६, ४६७.

डाव्या तीरावरील : ४६८, ४६९, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ५२४, ५२५, ५३०, ५३१, ५३३, ५३४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT