Exam latest marathi news esakal
नाशिक

BSc Computerच्‍या परीक्षेत CETमुळे बदल

अरूण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत (SPPU) बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (BSc Computer Science) अभ्यासक्रमांच्‍या अंतिम वर्षाच्‍या परीक्षा वेळापत्रकात बदल केलेला आहे.

लेखी पेपरच्‍या तारखेत एमसीए सीईटी (MCA CET) ही प्रवेशपरीक्षादेखील घेण्याचे नियोजित असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या हितासाठी परीक्षेच्‍या तारखांमध्ये बदल करत असल्‍याचे नमूद केले आहे. (Changes in BSc Computer Exam due to CET nashik education Latest Marathi News)

परीक्षा वेळापत्रकातील बदलाबाबत पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार बी.एस्सी. कॉम्‍प्‍युटर सायन्‍स या पदवी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा आणि एमसीए सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने लेखी परीक्षेच्‍या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे.

तृतीय वर्ष बी.एस्सी. (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स) परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी २ ते ५ ऑगस्‍टदरम्‍यानचे विविध विषयांचे लेखी पेपर १३ ते १९ ऑगस्‍टदरम्‍यान घेतले जातील.

यामध्ये फाउंडेशन्स ऑफ डेटा सायन्‍स विषयाचा पेपर १८ ऑगस्‍ट, ऑबजेक्‍ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग युझिंग जावा-१ चा पेपर १९ ऑगस्‍टला आणि ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग युझिंग जावा-२ विषयाचा पेपर १३ ऑगस्‍टला घेतला जाईल. कॉम्‍पिलियर कन्स्ट्रक्शन विषयाचा पेपर १७ ऑगस्‍टला घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT