procession Route esakal
नाशिक

विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे शहर, नाशिक रोड, गंगापूर या ठिकाणी मिरवणुकीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. शुक्रवारी (ता. ९) सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत या बदललेल्या मार्गावरूनच वाहतूक करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी दिले आहेत. (Changes in traffic routes due to Ganeshotsav 2022 immersion processions Nashik Latest News)

वाहतूक मार्ग

शहर विसर्जन मिरवणूक मार्ग

नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीला शुक्रवारी दुपारी वाकडी बारव (चौक मंडई) येथून प्रारंभ होईल. मिरवणूक जहाँगीर मशीद - दादासाहेब फाळके रोड - महात्मा फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगे महाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बॅंक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅन्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाणी जाणार आहे.

केलेले बदल

विसर्जन मिरवणुकीदरम्यान, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर बस या पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस व अन्य वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिक रोड, शहर व शहरातील अन्य ठिकाणी जातील. तर पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.

नाशिक रोड मार्ग

नाशिक रोडला बिटको चौकातून मिरवणूक निघेल. दुपारपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गावरील बदलाची अंमलबजावणी केली जाईल. बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलिस चौकी - सुभाष रोड - सत्कार पॉइंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावापर्यंत जाणार आहे.

कालावधीतील बदल

पंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅन्ड, महामार्ग, सिडको येथून नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बस दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच माघारी फिरतील. सिन्नरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बस व अन्य वाहने उड्डाणपुलावरून जा-ये करतील.

वाहतूक मार्ग

देवळाली विसर्जन मिरवणूक मार्ग

नाशिक रोड- देवळाली कॅम्प या मार्गावरील सिलेक्‍शन कॉर्नरपासून मिरवणुकीला प्रारंभ होईल. झेंडा चौक - शारदा चौक - जामा मशीद रोड - जुने बसस्टॅण्ड - सिलेक्‍शन कॉर्नर - संसारी नाका - संसारी गाव - दारणानदी. या मार्गावरील मिरवणुकीतील वाहने वगळता अन्य वाहनांना सदरचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.

गंगापूर पोलिस ठाणे (आनंदवली नदीपात्र)

आनंदवली नदीपात्रात आसपासची नागरी वस्ती, गणेश मंडळे गणेश विसर्जनसाठी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशावेळी चांदशी गावाकडून आनंदवली नदीपात्र ओलांडून आनंदवलीगाव मार्गे गंगापूरला जोडणाऱ्या रस्त्यास येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावापर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहील. नाशिककडे येणारी व नाशिकहून चांदशीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी आनंदवली

पुलाकडे न जाता चांदशीगाव रोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्या मार्गे मखमलाबाद रोडने लागून रामवाडी मार्गे अशोकस्तंभ ते गंगापूर रोड या मार्गाने प्रवास करावा.

जेल रोडच्या वाहतूक मार्गाचे बदल

नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक व सैलानीबाबा चौक ते नांदूर नाका हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद असेल. याकाळात नाशिक रोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका, औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पुलमार्गे जातील. त्याच मार्गाने येतील. वाहतूक मार्गातील बदल पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलातील वाहने व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT