exotic birds esakal
नाशिक

World Wetlands Day : नांदूरमध्यमेश्वरमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

आनंद बोरा

नाशिक : ‘अरे तो मोरा सारखा पक्षी बघ... बापरे, किती मोठा पक्षी आहे... वाँह, त्याचा आवाज किती सुंदर आहे...’ असा संवाद गुरुवारी (ता. २) पक्षितीर्थ समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभायारण्यात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बघावयास मिळाला.

पानथळीचे महत्त्व विद्यार्थांना समजावे, यासाठी वन विभागाने अभायारण्यातील आसपासच्या गावातील विविध शाळेतील शंभर विद्यार्थांना आमंत्रित करून पक्ष्यांची ओळख, पक्षी निरीक्षण, पाणथळाचे महत्त्व समजावून सांगितले.

तसेच वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी मार्गदर्शन करताना अभायारण्याची माहिती दिली. गावागावांत जनजागृती अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Chatter of students in Nandur Madhyameshwar bird sanctuary Nashik News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या कार्यक्रमात जनता हायस्कूल सायखेडा, के. के. वाघ हायस्कूल पिंपळस, व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिक, जनता प्राथमिक विद्यालय, शिंपी टाकळी, एनसीसी शिबिरातील मुले सहभागी झाले होते. ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, किशोर वडनेरे, मानद वन्यजीव वैभव भोगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

चापडगावचे सरपंच बबन दराडे, मांजरगावचे सरपंच सुनील सोनवणे, दिंडोरी तासचे सरपंच संदीप तासकर, करंजगाव माजी सरपंच खंडू बोडके आदींनी गावांविषयी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी सूत्रसंचालन केले.

वनपाल अनंत सरोदे यांनी आभार मांडले. वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, अमोल दराडे, प्रसाद बाबर, सुशीला आव्हाड, अमोल डोंगरे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, रोषण पोटे, विकास गारे, गंगाधर आघाव, प्रमोद मोगल, संजय गायकवाड, सुनील जाधव, रोहित मोगल, एकनाथ साळवे, ज्ञानेषर फापाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT