Bhausaheb Chaudhary, Sunil Patil during Balasaheb's entry into Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde. Guardian Minister Dada Bhuse, MLA Suhas Kande are neighbors. esakal
नाशिक

Nashik News: ज्यांच्याशी लढलो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ; चौधरी अन् पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाविकास आघाडी सरकारच्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आम्हाला दिलेल्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले तर प्रमुख सुनील पाटील यांनी ज्यांच्याशी दोन हात केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली त्यामुळे आपण प्रवेश करत असल्याचे स्पष्टीकरण दिले. (Chaudhary and sunil patil entry into Shinde group Nashik political News)

शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी प्रवेशाचे स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

शिवसेनेत शाखा प्रमुख ते नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख राहिलेले सुनील पाटील यांनी या प्रसंगी आपण आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संघर्ष केला त्यांच्या बरोबर काम करताना शिवसेनेचीच पीछेहाट होत होती, त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करणे असहनिय होत होते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बाळासाहेबांचे विचारांची शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अशी अवहेलना होत असेल तर आपण तिथे न राहता बाळासाहेबांच्या विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काम करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले.

यावेळी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

SCROLL FOR NEXT