cyber crime fraud news
cyber crime fraud news esakal
नाशिक

PAN Card अपडेटच्या नावाखाली भामट्याने केली 2 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पॅनकार्ड अपडेट न केल्यास खाते बंद करण्याचा मेसेज मोबाईलवर पाठवून भामट्याने ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (cheating of 2 lakhs in name of PAN Card update Nashik Latest Crime News)

विजयकुमार गोविंदराव ठुबे (रा. सिंहगड रोड, पुणे) हे रविवारी (ता.११) नाशिकला काही कामानिमित्ताने आले. त्या वेळी त्यांना ७६०६८२५०५२ या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात भामट्याने मेसेज केला. तसेच, कॉल करून संपर्कही साधत, तुमच्या एचडीएफसी बँकेच्या खात्याला जोडलेले पॅनकार्ड अपडेट केले नाही तर, खाते बंद करण्यात येईल अशी भीती घातली.

त्यासाठी त्याने पाठविलेल्या मेसेजवरील लिंकवर जाऊन बँक खात्याच्या माहितीसह गोपनीय माहिती व मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक भरण्यास सांगितले. ठुबे यांनी त्याप्रमाणे माहिती भरली. त्या माहितीच्या आधारे संशयिताने ठुबे यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख ९९ हजार ३४२ रुपये वर्ग करून फसवणूक केली.

याप्रकरणी ठुबे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात भामट्यासह संबंधित एचडीएफसी बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT