Officials of the Sakal Maratha community while giving a statement to Senior Police Inspector Madhukar Kad of Panchvati Police Station demanding that action should be taken against Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal in connection with his controversial statement in a meeting in Ahmednagar. esakal
नाशिक

Nashik News: भुजबळांचा जामीन रद्द करण्यात यावा; मराठा समाजाची मागणी

अहमदनगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ‘तुम्ही मराठा समाजाच्या लोकांची दाढी- कटिंग करू नये, म्हणजे ते एकमेकांची भादरत बसतील’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मराठा व नाभिक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अहमदनगरच्या जाहीर सभेत केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजातर्फे पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे.

त्यांची वैद्यकीय तपासणी करून जामीन रद्द करावा, असेही निवेदन देण्यात आले. (chhagan Bhujbal bail should cancelled Demand of Maratha community Controversial statement about nabhik society Nashik News)

अहमदनगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ‘तुम्ही मराठा समाजाच्या लोकांची दाढी- कटिंग करू नये, म्हणजे ते एकमेकांची भादरत बसतील’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीकडून असंसदीय भाषा वापरून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे नाभिक समाजातही असंतोष पसरला असून, नाभिक समाजाचे नेते काशीद यांनी भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.

दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळ यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. बेकायदेशीररीत्या मालमत्ता जमा केल्याबद्दल यापूर्वी भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या प्रकृतीच्या कारणाने ते जामिनावर असून, राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यावरून त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करून जामीन रद्द करण्याची मागणी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सकल मराठा समाजाचे चंद्रकांत बनकर, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, योगेश नाटकर, अनिल आहेर, भाऊसाहेब निकम, विजय देवरे, सोपान देवकर, राजू हिरे, हिरामण वाघ, वैभव दळवी, हार्दिक निगळ, विकी गायधनी, शंकर वाघमारे, ज्ञानेश्वर सुरवसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT