chhagan bhujbal comment on sharad pawar yeola meeting nashik news  esakal
नाशिक

Chhagan Bhujbal Latest Update: पवार साहेबांचे माझ्यावर प्रेम म्हणूनच येवल्यात पहिली सभा; भुजबळांची मिश्किल टिप्पणी

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar News : शरद पवार हे पहिली सभा आंबेगावसह अन्य ठिकाणी घेणार होते. मात्र सर्व सभा रद्द करून येवल्यातच त्यांनी सभा घेतली, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी येवल्यात सभा घेतली, अशी टिप्पणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

मंत्रिपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. भुजबळ नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच आले. या वेळी त्यांचे पाथर्डी फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. (chhagan bhujbal comment on sharad pawar yeola meeting nashik news)

त्यानंतर श्री. भुजबळ यांनी ‘भुजबळ फार्म’ येथे माध्यमांशी संवाद साधला. येवल्यातील सभेसंदर्भात ते म्हणाले, की पवारसाहेब यांचे माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळेच त्यांनी येवल्यात सभा घेतली.

यापूर्वी आंबेगावसह अन्य ठिकाणी त्यांच्या सभा होणार होत्या, मात्र त्यांनी त्या सर्व सभा रद्द केल्या. काँग्रेसमधून बाहेर पडताना पी. ए. संगमा, तारिक अन्वरही त्यांच्यासमवेत होते. त्या वेळी मी राज्यात विधानसभेचा अध्यक्ष होतो. माझ्याच बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली.

पक्षाचे नाव, चिन्ह तसेच माझ्या माझगाव मतदारसंघातील एक हजार नागरिकांचे प्रतिज्ञापत्र संकलित करण्याचे काम झाले. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणारा मी पहिला आहे. त्या वेळी मी पहिला प्रदेशाध्यक्षदेखील झालो. काँग्रेसने परिस्थिती लक्षात घेऊन मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पवार यांचे माझ्यावर प्रेम असल्याने येवल्यात सभा घेतल्याची मिश्किल टिप्पणी श्री. भुजबळ यांनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मतदारांच्या आग्रहाखातर

छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आवश्यकता वाटल्याने त्यांना सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी मीच येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवण्याची सूचना केल्याचे वक्तव्य श्री. पवार यांनी येवल्यातील सभेपूर्वी केले होते. त्याला उत्तर देताना श्री. भुजबळ यांनी मतदारांच्या आग्रहाखातर येवल्यातून निवडणूक लढविल्याचे सांगितले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, जुन्नर व येवला हे तीन मतदारसंघाचे पर्याय होते.

त्या वेळी येवला मतदारसंघातील सर्व सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक नेत्यांनी आग्रह धरला. रामटेक बंगल्यावर गर्दी झाली. त्या वेळी दुष्काळाची ओळख असलेल्या मतदारसंघाची ओळख पुसून टाकण्यासाठी गरज असल्याचे लोक म्हणायचे. त्यामुळे निवडणूक लढविली व मतदारांनी मोठा आशीर्वाद दिला. मतदारांची इच्छा आहे, तोपर्यंत लढत राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT