tejas thackeray Google
नाशिक

मुख्यमंत्र्यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात येणार का? भुजबळ म्हणाले..

विनोद बेदरकर

नाशिक : राजकीय नेत्यांची मुले राजकारणात प्रवेश करतात यात नवीन काही नाही. ठाकरे कुटुंबात देखील असाच राजकीय वारसा चालत आलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हा वारसा राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरेंना मिळाला. हाच वारसा पुढे चालवण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात प्रवेश करतील का याबद्दल जोरात चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस यांचा आज वाढदिवस असून, ते राजकारणात येणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे. भुजबळ आणि शिवसेना यांचा जवळचा संबंध असल्याने भुजबळ यांना तेजस ठाकरेंच्या राजकारणाच्या एन्ट्रीच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, की, तेजस अतिशय अवघड आहे, तो माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी या विषयात त्याचा गाढा अभ्यास आहे. विज्ञानाची कास सोडून तो राजकारणात येईल, असे मला वाटत नाही. , पण तरी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याबाबतचा निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील. युवकांनी राजकारणात आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ऑपरेशन कमळ होणार नाही

दिल्लीत भाजपची बैठक होत आहे. राज्यातील नेते दिल्लीत गेले आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केले. दिल्लीत काहीही होऊ द्या, कितीही बैठका होऊ द्या. पण राज्यात ऑपरेशन कमळ होणार नाही. भाजप-मनसे एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना एकत्र येण्याचे अधिकार आहेत. शेवटी कुणाच्या बाजूने कौल द्यायचा, हे लोक ठरवत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT