Chhagan Bhujbal esakal
नाशिक

''देशी गाळणारेच वाईन विरोधासाठी आघाडीवर'' - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाईन म्हणजे दारु नव्हे, त्यामुळे वाईनला विरोध करण्याची गरज नाही. प्रत्येक निर्णयाला सुरुवातीला विरोध होतोच पण किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांत कारखान्यात दारु गाळणाऱ्यापैकीच काही जण आघाडीवर आहेत. अशी टिका पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.

या निर्णयामागे शेतकरी अर्थकारण - पालकमंत्री

राज्य शासनाने किराणा मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात टिका होत असल्याने त्याविषयी भुजबळ यांनी टिकाकारांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, वाईन हे हेल्‍दी पेय आहे. वाईनकल्चर वाढवावे यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामागे शेतकरी अर्थकारण आणि आरोग्यदायी पेय मिळावे अशी भूमिका आहे. त्यामुळे वाईन विक्रीला विरोध करण्याची गरज नाही. कुठलाही निर्णय घेतला म्हणजे त्याला सुरुवातीला विरोध होतो. गंगापूर धऱणावर बोटक्लब सुरु करण्याच्या निर्णयावेळी असाच विरोध झाला मात्र आता बोटींग क्लबवर सगळ आलबेल सुरु आहे. वाईन बाबतीत तसेच होईल. दरम्यान याला विरोध करणाऱ्यात कारखान्यात दारु गाळणारेच आघाडीवर आहे. अशी टिका केली.

मी हिंट दिली, शोध तुम्ही घ्या

वाईनला विरोध करणारे ते दारु गाळणारे कोण? याविषयी विचारले असता, मी हिंट दिली आहे. पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. हिंट देण्याचे काम मी केले आहे. इन्वेस्टींगेशनचे काम तुम्ही करा. असा सावध पवित्रा घेतांना त्यांनी वाईनला विरोध करणाऱ्या विरोधकांचे नाव घेण्याचे टाळले.

ऑफलाईन परिक्षेत गैर काय?

राज्यात दहावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी जोर धऱत असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्याविषयी भुजबळ म्हणाले की, जे ऑनलाईन शिकले तेच ऑफलाईन पेपरमध्ये लिहायचे आहे. त्यात चुकीचे काय आहे. ऑनलाईन अभ्यास केला असेल तर ऑफलाईन पेपरला का घाबरायचे. फक्त कागदावर तर लिहायचे आहे. असा उलटा प्रश्न केला तसेच वीज बिलाविरोधात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्याबाबतही त्यांनी वीज कंपनीवर ५५ ते ६० हजार कोटीचे कर्ज असून कंपनी वाचविण्यासाठी वीज बिल भरणे गरजेचे आहे. कंपनीने ३३ टक्के सवलत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT