chhagan bhujbal with team esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : शरद पवारांमध्ये पहाडासारख्या कामाची क्षमता, बावनकुळेची काय? छगन भुजबळांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : रयत शिक्षण संस्थेसह क्रिकेट मधील अनेक मोठ्या संस्थांवर सर्वोच्च पदावर काम करण्याची क्षमता पहाडासारख्या शरद पवारांमध्ये आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेमध्ये अशी क्षमता नसल्याने यावर बोलू नये, असा चिमटा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काढला. (Chhagan Bhujbal reaction sttaement sharad Pawar ability to work like mountain what about Bawankule nashik news)

आज येथे आलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कर्नाटक सीमावर्ती मराठी भाग सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरीकडे प्रचार केला असतात तर बरे झाले असते.

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या, हे योग्य आहे का?, या प्रश्नांवर ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेसह अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठमोठ्या संस्थांवर प्रमुखपदी जाण्यासाठी तितकी योग्यता लागते. साखर उद्योगात असलेल्या मोठमोठ्या संस्थांवर पवार साहेबांनी काम केले आहे.

क्रिकेट क्षेत्रातील देशातील असलेली संस्था बीसीसीआय आणि विदेशात असलेल्या जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून पु.ल.देशपांडे यांच्यासह इतर साहित्यिकांच्या भाषणांचे एकत्रीकरण करत असून असे चौफेर काम करणारे पवार साहेब अद्वितीय आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र इतकी क्षमता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात नाही, त्यामुळे इतक्या मोठ्या पहाड्यासारख्या व्यक्तीवर बोलू नये असा टोला भुजबळांनी बोलताना लगावला.

राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा असल्याच्या बावनकुळेच्या व्यक्तव्याचा समाचार घेताना भुजबळ म्हणाले की, दुसऱ्या पक्षामध्ये काय चालू आहे याकडे डोकविण्याची काय गरज आहे.

आमच्या पक्षात लोकशाही आहे मला कल्पना आहे की भाजपमध्ये लोकशाही नाही, त्यामुळे दुसऱ्या पक्षामध्ये असलेल्या उणिवांवर बोट तुम्ही ठेवू शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये लोकशाही चालते.

त्यामुळे कोणी काही बोलले तरी समजूत काढता येते, समजूत काढण्यासाठी आमचे अध्यक्ष शरद पवार हे समर्थ आहेत. पक्ष एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्या एवढा अनुभवी नेता हा महाराष्ट्रात तर सोडा देशात नसल्याचे सांगत तुम्ही कर्नाटकमध्ये काही कमी पडत असेल तर तेथे जा तेथे चांगला रिपोर्ट येण्यासाठी प्रयत्न करा,येथे काही भाजपचा चांगला रिपोर्ट येणार नसल्याचे सांगत भुजबळ यांनी टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT