nashik lockdown esakal
नाशिक

Nashik weekend lockdown: काय म्हणाले छगन भुजबळ?

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्याचा कोरोना संसंर्गदर कमी झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही घटत आहे. त्यामुळे शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करावा, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. याच विकेंड लॉकडाऊनबाबत कोरोना आढावा बैठकीनंतर काय म्हणाले पालकमंत्री छगन भुजबळ? वाचा सविस्तर...(Chhagan-Bhujbal-said-about-Weekend-Lockdown-jpd93)

शिथिलतेबाबत राज्य शासनाला तसा प्रस्तावही पाठविला

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. राज्य शासनाला तसा प्रस्तावही पाठविला आहे. मात्र तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम राहणार आहे. शासनाकडून परवानगी आल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्याचा कोरोना संसंर्गदर कमी झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही घटत आहे. त्यामुळे शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करावा, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरू आहे. दोन दिवसांपैकी एक दिवस निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य टास्क फोर्सला प्रस्ताव द्यावा. त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

किमान एक दिवसाचा विचार

राज्य शासनाच्या परवानगी नंतरच वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय होणार आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउनमधील एक दिवस शिथिल करावा, खरेदीच्या कामकाजाच्या वेळा वाढवाव्यात. यासारख्या अनेक मागण्यांबाबत प्रशासन विचार करीत आहे. मात्र हे सगळे विषय राज्य शासनाच्या परवानगीचे असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

चित्रीकरणाला परवानगी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने त्र्यंबकेश्वर व नाशिकला चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल. जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी पर्यटनाला वाव असल्याने चित्रीकरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना शून्य रुग्णसंख्या असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली असली तरी, जर संबंधित गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर, मात्र शाळा बंदचा पर्याय असल्याचे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार नाही याची त्या त्या भागातील लोकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापलिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

रस्त्यांवरील गर्दी चिंताजनक

तत्पूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दर घटला आहे. मात्र रस्त्यावर गर्दी होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आठवड्यातील सहा दिवस कामकाज सुरू ठेवता येईल का, याचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Supply: हॉटेलचे जेवण महागणार! व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांना झटका

तुमचे Google अकाउंट कोणत्या Unknown डिव्हाइसवर लॉगिन आहे? तपासून लगेच करा डिलीट..पाहा स्टेप-बाय-स्टेप गाइड

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT